शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सहा हजार एनजीओंचे परवाने धोक्यात

By admin | Updated: July 12, 2017 00:21 IST

विदेशातून मिळणाऱ्या निधीची माहिती न देणाऱ्या ६००० स्वयंसेवी संस्थांविरुद्ध (एनजीओ) सरकारने कारवाईची छडी उगारली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : विदेशातून मिळणाऱ्या निधीची माहिती न देणाऱ्या ६००० स्वयंसेवी संस्थांविरुद्ध (एनजीओ) सरकारने कारवाईची छडी उगारली आहे. या एनजीओंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून त्यांचे लायसन्स (परवाने) रद्दही केले जाऊ शकते. गृह मंत्रालयाच्या आदेशानंतरही या संस्थांनी उत्पन्न आणि खर्चाचा हिशेब दिलेला नाही. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नोटिसमध्ये या एनजीआेंना गत पाच वर्षांचा हिशेब न दिल्याबाबत विचारणा केली आहे आणि त्यांचा परवाना का रद्द करण्यात येऊ नये? असे विचारले आहे. मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ८ जुलै रोजी ६००० एनजीओंना नोटीस जारी करुन २३ जुलैपर्यंत यावर उत्तर देण्यास सांगितले आहे. यावर्षी मेमध्ये मंत्रालयाकडून १८,५२३ एनजीओंना नोटीस जारी करण्यात आली होती आणि १४ जूनपर्यंत हिशेब देण्यास सांगितले होते. ज्या संस्थांनी मुदतीच्या आत उत्तर दिले नाही त्यांचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. या एनजीओेंची नोंदणी विदेशी योगदान नियमानुसार झालेली आहे. त्यानुसार त्यांना विदेशी निधी घेण्याची परवानगी देण्यात येते. सूचना करुनही ५९२२ संस्थांनी त्यांचे वार्षिक रिटर्न तीन वा अधिक वर्षांपासून दाखल केले नाहीत. >एकाच बँकेत निधीची सूचनासरकारने ३० जून रोजी देशभरातील ३,७६८ एनजीओंना सूचना केली होती की, त्यांना मिळणारा निधी एकाच बँक खात्यात जमा करण्यात यावा आणि त्याची माहिती सरकारला देण्यात यावी. ज्या एनजीआेंकडून नियमांचे पालन होत नाही त्यांची नोंदणी सरकारकडून रद्द केली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.