शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

६० टक्के मुस्लिम महिलांना ‘एकतर्फी’ घटस्फोट

By admin | Updated: November 8, 2015 02:01 IST

एकाच वेळी तीनदा ‘तलाक’ शब्द उच्चारून ६० टक्के मुस्लिम महिलांना पतीकडून एकतर्फी घटस्फोट दिला जातो, असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.

नवी दिल्ली : एकाच वेळी तीनदा ‘तलाक’ शब्द उच्चारून ६० टक्के मुस्लिम महिलांना पतीकडून एकतर्फी घटस्फोट दिला जातो, असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.या घटस्फोटित महिलांना त्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून किंवा स्थानिक काजीकडून मिळते. काही महिलांना एसएमएस किंवा ई-मेलद्वारे घटस्फोटाची माहिती मिळते, असेही या सर्वेक्षणात म्हटले आहे.‘भारतीय मुस्लिम महिला आंदोलन’ या नावाच्या स्वयंसेवी संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे. त्यात ९२ टक्के महिलांनी तीनदा ‘तलाक’ हा शब्द उच्चारून घटस्फोट घेण्यास विरोध केला असून, ही प्रक्रिया बदलण्याची मागणी केली आहे. घटस्फोट देण्यात आलेल्या महिलांपैकी ८० टक्के महिलांना चरितार्थासाठी भत्ता दिला जात नाही. त्याचवेळी त्यांच्या ‘निकाह’च्या वेळी मंजूर करण्यात आलेली मेहरची रक्कमही १६ टक्के महिलांना माहीत नाही, असेही हे सर्वेक्षण म्हणते. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लुबना चौधरीने विपरित अनुभव सांगितले.- या महिलेने सांगितले की, माझ्या पतीने मला प्रचंड मारहाण केली आणि माझ्या गर्भाशयात काचेचे तुकडे सापडले. २० व्या वर्षीच माझा विवाह झाला होता. लग्नानंतर काही महिन्यांतच मी आई बनले. माझा पती वाईट सवयी असणारा होता. त्याचे कुटुंबाकडे मुळीच लक्ष नव्हते. त्याबाबत त्याच्याकडे विचारणा करताच त्याने मला मारहाण केली.लुबनाला तिच्या पतीने आठवीची परीक्षाही देऊ दिली नाही. तिला घरातच कोंडून ठेवले. तिचे प्रचंड शारीरिक शोषण केले; तरी पण तिने हार मानली नाही. ती म्हणाली की, एके दिवशी पतीने दरवाजा बंद केला आणि रॉडने भयंकर मारहाण केली. त्याने मला किती बदडले हे मला माहीत नाही. दरवाजा उघडल्यानंतर माझ्या नातेवाईकांनी माझी भयंकर स्थिती पाहून मला इस्पितळात नेले.या स्वयंसेवी संस्थेच्या सहसंस्थापक जाकिया सोमन यांनी घटस्फोटाच्या या पद्धतीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या की, आम्ही समान नागरी कायद्याच्या बाजूने नाहीत; पण मुस्लिम पर्सनल कायद्यात बदल करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने सर्वात अगोदर ‘ट्रिपल तलाक’वर बंदी घालण्याची आवश्यकता आहे.लीगल स्कॉलर प्रोफेसर ताहीर महमूद म्हणाले की, या सर्वेक्षणातील निष्कर्ष भीतिदायक असून, समाजात इस्लामच्या नियमांचा दुरुपयोग होतो, हे त्यातून दिसून येते.