शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

जैशचे ६ दहशतवादी काश्मीरमध्ये जेरबंद

By admin | Updated: February 26, 2016 03:49 IST

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात नियंत्रण रेषेजवळ तंगधार सेक्टरमध्ये लष्कराच्या छावणीवरील हल्ल्यात सामील जैश-ए-मोहम्मदच्या सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यात एक

श्रीनगर : गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात नियंत्रण रेषेजवळ तंगधार सेक्टरमध्ये लष्कराच्या छावणीवरील हल्ल्यात सामील जैश-ए-मोहम्मदच्या सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यात एक पाकिस्तानी दहशतवादी असून सुरक्षा दलाने उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात एका दहशतवादी अड्ड्याचाही पर्दाफाश केला आहे.पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी या घटनेची माहिती देताना सांगितले की, जिल्हा मुख्यालयात एक पाकिस्तानी दहशतवादी घुसला असल्याची गोपनीय सूचना मिळाल्यावर सुरक्षा दलाने बारामुल्ला जिल्ह्णात शोध मोहीम राबविली होती. अटकेतील जैशच्या पाकिस्तानी दहशतवाद्याचे नाव मोहम्मद सिद्दिकी ऊर्फ शाहद असून तो सियालकोट येथील रहिवासी आहे.इतर दहशतवाद्यांमध्ये सुहेल आरिफ, राशिद रसूल भट, जावेद अहमद धोबी,फरहान फयाज आणि एहसान फयाज यांचा समावेश आहे. गेल्यावर्षी तंगधारमधील लष्करी छावणीवर हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघातकी पथकात आपला समावेश होता,अशी कबुली या पाकिस्तानी दहशतवाद्याने जाबजबाबादरम्यान पोलिसांना दिली आहे. लष्कराने हा हल्ला उधळून लावला होता. यात तीन दहशतवादी आणि एका नागरिक ठार झाला होता. काश्मीर आणि खोऱ्याबाहेर अन्य काही ठिकाणी हल्ल्याची आमची योजना होती. त्यानुसार बारामुल्लाला पोहोचल्यानंतर जैशच्या इतर सदस्यांना आपण भेटणार होतो,असेही सिद्दिकीने पोलिसांना सांगितले. काश्मिरातील दहशतवादी कारवाया वाढविण्याच्या दृष्टीने येथे आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सिद्दिकीने चालविला होता. परंतु पोलीस आणि सुरक्षा दलाच्या कारवाईमुळे त्याचा हा कट उधळला गेला.सुरक्षा दलाने अटक केलेल्या दहशतवाद्यांजवळून एक एके ४७ रायफल, पाच मॅग्झिन,१५० गोळ्या, सहा ग्रेनेडस आणि एक वायरलेस सेट जप्त केला. (वृत्तसंस्था)दहशतवाद्यांनीच ही स्फोटके पेरली असावीत,असा पोलिसांचा कयास आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला असून दहशतवाद्यांची धरपकड सुरू आहे.स्फोटके जप्तबारामुल्ला जिल्ह्यात एका कचरापेटीत लपवून ठेवलेली स्फोटके वेळीच जप्त करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. श्रीनगरपासून ५५ किमी अंतरावरील बारामुल्ला जिल्ह्याच्या ख्वाजा बागेत एका प्रवासी विश्रामगृहाजवळील कचरापेटीत आढळलेली ही स्फोटके नंतर निष्क्रिय करण्यात आली.