शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वडगावचे २० तर नांद जलाशयाचे ६ दरवाजे उघडले

By admin | Updated: August 13, 2015 23:24 IST

वडगावचे २० तर नांद जलाशयाचे ६ दरवाजे उघडले

वडगावचे २० तर नांद जलाशयाचे ६ दरवाजे उघडले
बेला : सर्वत्र झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील वडगाव जलाशय ९३ टक्के तर नांद जलाशयात १०० टक्के पाणी पातळी वाढली. या भागात बुधवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. बेला-उमरेड मार्ग गुरुवार सकाळपासूनच बंद होता. निम्न वेणा प्रकल्प वडगाव जलाशय ९३ टक्के भरल्याने सकाळी तीन गेट उघडण्यात आले तर दुपारी २ वाजेपर्यंत २१ पैकी १० गेट २५ सेमी ने तर १० गेट ५० सेमीने वर उचलण्यात आले. यात पाण्याचा साठा १२५.०४१ द.घ.ल.मी, ९३ टक्के, विसर्ग ७०२.२८ घ.मी.प्र.से. तर येवा ४४५ घ.न.मी.प्र.से. इतका आहे. धरणाची क्षमता १३४.८९६ द.ल.घ.मी एवढी आहे.
वडगाव जलाशयाला कार्यकारी अभियंता खापेकर यांनी भेट देऊन तेथील आढावा घेतला तर उपविभागीय अभियंता एच. पी. गहलोत व शाखा अभियंता व्ही. के. पाटील तसेच कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
तसेच नांद जलाशयाचे सातपैकी सहा गेट एक मीटरने उचलण्यात आले. यात साठा २८७ म्हणजे १०० टक्के, विसर्ग ५८३ घ.मी.प्र.से. आहे. नांद जलाशयाची क्षमता ५३.१८ द.ल.घ.मी आहे.
नांद जलाशयातील पाणी नदीपात्रात सोडल्याने पिपरा गावात पाणी शिरले. त्यामुळे बेला-उमरेड मार्ग बंद होता. पुरामुळे पिपरा येथील मनोज तेलरांधे यांचा गोठा पूर्णत: कोसळला. मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुसळधार पावसामुळे बेला परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. बेला-सोनेगाव, बेला-समुद्रपूर व बेला-उमरेड मार्ग बंद पडल्याने वाहतुकीची कोंडी झाली. नांद व वेणा नदी तसेच परिसरातील नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेकांची पिके वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.