शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

6 किलोमीटर प्रवासासाठी उबरनं मागितले 5,000 रुपये भाडे

By admin | Updated: May 5, 2017 16:29 IST

केवळ 5 किलोमीटर प्रवासाचे 5,325 रुपयांचे बिल एका उबर टॅक्सी चालकाने प्रवाशाच्या हातात दिले.

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 5 -  म्हैसूरहून आलेल्या एका इंजिनिअरने सिटी रेल्वे स्टेशनहून सॅटलाइट बस स्थानकापर्यंत जाण्यासाठी उबर टॅक्सीतून प्रवास केला. जवळपास 6 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासाचं झालेल्या बिलाची किंमत तुम्ही ऐकली तर कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही. उबर टॅक्सी चालकाने केवळ 5 किलोमीटर प्रवासाचे त्या इंजिनिअरला 5,325 रुपयांचे भाडे झाल्याचे चालकाने सांगितले.   
 
इंजिनिअर असलेल्या प्रवीणला बुधवारी येथून म्हैसूरकडे पुन्हा परतायचे होते.  या प्रवासासाठी त्याला टॅक्सची गरज होती, मात्र त्याच्या मोबाइल फोनमध्ये उबरचं अॅप नव्हतं. यासाठी सिटी रेल्वे स्टेशनहून टॅक्सी उपलब्ध करुन देण्यासाठी त्यानं एका एजंटला गाठलं. 
 
व त्याला सांगितले की, "मला म्हैसूरमध्ये लवकर पोहोचायचे होते. मात्र नेमकी 3.30 वाजता असलेली ट्रेन चुकली. यानंतर म्हैसूरकडे जाण्यासाठी सॅटलाइट बस स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी मी टॅक्सी केली. सकाळी 4.30 वाजता टॅक्सीत बसलो आणि बस स्थानकावर पोहोचल्यानंतर मीटरकडे पोहतो तर काय तब्बल 5,352 रुपयांचे भाडे मला दिसले. मी चालकाला विचारले तर त्याने सांगितले की आताचे भाडे केवळ 103 रुपये आहे उर्वरित जुन्या प्रवाशाचे भाडे आहे. हे ऐकल्यानंतर मला विश्वासच बसला नाही कारण गेल्या 2 वर्षांत मी केवळ दुस-यांदाच उबर टॅक्सीचा वापर करत आहे."
 
यावेळी प्रवीणनं चालकाला सांगितले की, यंत्रात काही तांत्रिक बिघाड असू शकतो. तसेच प्रवीण केवळ 103 रुपयेच भाडे देणार असल्याचे सांगितले, तेव्हा चालक ती रक्कम स्वीकारण्यास तयारच नव्हता. यानंतर चालकाने उबर कॉल सपोर्टला फोन केला, त्यांनी सांगितले संपूर्ण भाडे वसुल करुन घे अथवा भाडे न दिल्यास ग्राहकाला गाडीतून खाली उतरू देऊ नकोस", असा फर्मानच संबंधित चालकाला देण्यात आला. 
 
त्यावरही प्रवीणनं पैसे द्यायला नकार दिल्यानंतर चालकाने पोलिसांना संपर्क साधला. त्यावेळी प्रवीणला थोडी दिलासादायक परिस्थिती निर्माण झाल्यासारखे वाटले कारण चालकासोबत हुज्जत घालण्याऐवजी त्याला पोलिसांकडे दाद मागण्याची संधी मिळणार होती. पण इथेही भलतीच समस्या निर्माण झाली. ही दुसरी समस्या काय तर पोलीस स्टेशनपर्यंतच भाडे कोण भरणार? बरीच वादावादी झाल्यानंतर चालक पोलीस स्टेशनपर्यंत येण्यासाठी तयार झाला.
 
भाई तारयनपुरा पोलीस स्टेशन पोहोचल्यानंतर प्रवीणनं संपूर्ण हकिगत पोलिसांना सांगितली. त्यानंतर संबंधित टॅक्सी चालक ग्राहकाकडून केवळ 103 रुपयेच वसुल करू शकतो, असे पोलिसांनी सांगितले.  दरम्यान, या टॅक्सी चालकानं "बंगळुरू मिरर" वृत्तपत्रासोबत संवाद साधताना सांगितले की, "माझ्याकडे संपूर्ण भाडे वसुल करण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण उर्वरित 5 हजार रुपये माझ्या खात्यातून कापले जाण्याची भीती मला होती". 
 
दरम्यान, उबर कंपनीच्या एका अधिका-यांनी सांगितले की, " टॅक्सीच्या मीटरमध्ये झालेला तांत्रिक बिघाड आता दुरुस्त करण्यात आला आहे. व त्यामुळे ग्राहकांना झालेल्या त्रासबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत."