शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

५७ उद्योगपतींकडे थकले ८५ हजार कोटी रुपये

By admin | Updated: October 26, 2016 05:17 IST

देशातील केवळ ५७ लोकांकडे विविध बँकांचे ८५ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या एका प्रकरणात ही माहिती समोर आली.

नवी दिल्ली : देशातील केवळ ५७ लोकांकडे विविध बँकांचे ८५ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या एका प्रकरणात ही माहिती समोर आली.५00 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे कर्ज थकविणाऱ्या कर्जदारांची यादी तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँकेला सांगितले होते. रिझर्व्ह बँकेने त्यावर ही माहिती न्यायालयास दिली. सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर, न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. एल. नागेश्वर राव यांच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. मोजक्या लोकांकडे थकलेल्या प्रचंड रकमेचा आकडा पाहून न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करून म्हटले की, कर्ज घेऊन ते न फेडणारे हे लोक अखेर आहेत तरी कोण? या लोकांची नावे का माहिती होऊ नये? कर्ज मर्यादा ५00 कोटीपेक्षा कमी केल्यास थकलेल्या कर्जाचा आकडा एक लाख कोटीपेक्षा जास्त असेल, हे उघडच आहे. सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या स्वयंसेवी संस्थेने या संबंधीची याचिका दाखल केली आहे. याचिका कर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी बाजू मांडली. कर्ज थकविणाऱ्यांची नावे जाहीर करायची की नाहीत, या मुद्द्यावर आता २८ आॅक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. हजारो कोटी बुडविणारे सुखात, शेतकरी मात्र त्रस्तभारतीय बँकिंग व्यवस्थेतील अव्यवस्थेवर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार ताशेरे ओढले. न्यायालयाने म्हटले की, बुडीत कर्जांची वाढती रक्कम चिंताजनक आहे. लोक हजारो कोटी रुपये कर्ज घेतात. आपल्या कंपन्या दिवाळखोर घोषित करतात आणि नंतर पळून जातात. पंधरा-वीस हजारांचे कर्ज घेणारे गरीब शेतकरी मात्र त्रस्त होतात. रिझर्व्ह बँकेने देशहितासाठी काम लोक माहिती अधिकारात प्रश्न विचारत असतील, तर त्यांनी कर्ज परतफेड न करणारे हे लोक कोण आहेत, हे याची माहिती लोकांना मिळायला हवी. कर्ज थकविणाऱ्यांची माहिती का रोखायची?, असा सवाल न्यायालयाने रिझर्व्ह बँकेला केले. रिझर्व्ह बँकेच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, कर्ज थकविणाऱ्यांपैकी सर्वांनीच हेतूत: तसे केलेले नाही. रिझर्व्ह बँक बँकांच्या हितासाठी काम करीत आहे, तसेच कायद्यानुसार थकबाकीदारांची नावे जाहीर करता येत नाही. त्यावर न्यायालयाने सांगतिले की, रिझर्व्ह बँकेने बँकांच्या हितासाठी नव्हे, तर देशाच्या हितासाठी काम करावे.