शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

५० हेक्टर जागेत ५५,५०० रोपांची लागवड

By admin | Updated: July 10, 2015 00:26 IST

खंबाळे : वनविभागाच्या जागेवर साकारणार वन

खंबाळे : वनविभागाच्या जागेवर साकारणार वननाशिक : शासनाच्या आवाहनानुसार ओसाड भूखंडावर वननिर्मितीसाठी सॅमसोनाईट साऊथ एशिया कंपनीने पुढाकार घेत ५० हेक्टर जागेवर त्रिपक्षीय कराराअंतर्गत ५५ हजार पाचशे रोपांच्या लागवड व संवर्धनासाठी तयारी दर्शविली आहे. औद्योगिक प्रतिष्ठान व अशासकीय संस्थांच्या माध्यमातून ओसाड जागांवर हिरवळ करण्यासाठी शासनाकडून औद्यागिक संस्थांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार इगतपुरी तालुक्यात वनविभागाच्या ५० हेक्टर जागेवर वनीकरणासाठी सॅमसोनाईट कंपनीने पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत घोटी-खंबाळे शिवारात सुमारे ५५ हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. लावलेल्या रोपांचे पुढील सात वर्षांपर्यंत संरक्षण व संवर्धनाची जबाबदारीदेखील सॅमसोनाईट व तैनवाला फाउण्डेशनकडून स्वीकारण्यात आल्याची माहिती सॅमसोनाइटचे मिलिंद वैद्य, व्यवस्थापक सुयोग जोशी, बन्सीधर जोशी, अनील थोरवे, सतीश पावसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे. खंबाळेगावाच्या हद्दीतील वनविभागाच्या वन कक्ष क्रमांक ३२६ मधील ५० हेक्टर जागेवर रोपांची लागवड के ली जाणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार वनविभाग, सॅमसोनाईट औद्योगिक संस्था व तैनवाला फाउण्डेशन असा त्रिपक्षीय करार गेल्या महिन्यात करण्यात आल्याचे सतीश पावसे व वाय. एम. सिंग यांनी यावेळी सांगितले. प्रस्तावाच्या मंजुरीसाठी मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील, उपवनसंरक्षक अनिता पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय अहिरे आदि प्रयत्नशील होते. या जागेवर करण्यात येणार्‍या रोपांच्या लागवडीमध्ये आवळा, चिंच, देशी आंबा, जांभूळ, पिंपळ, मोह, सावर, शिरस, सीताफळ, खैर, आपटा, कांचन, करंज, कडूनिंब आदि भारतीय प्रजातींच्या समावेश आहे. रोपांच्या लागवडीमध्ये संयोजकांमार्फत परिसरातील शालेय विद्यार्थी, सामाजिक संघटना, गोंदे औद्योगिक वसाहतीमधील कर्मचारी वर्ग, स्थानिक नागरिक यांच्या सहभाग वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ५० हेक्टर अर्थात १२५ एकर जागेवर दोनशे आदिवासी मजुरांमार्फत ५५ हजार ५०० खड्डे खोदून तयार ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणी लोकसहभागातून रोपांची लागवडीला प्रारंभ करण्यात आला असून, अद्याप ११ हजार झाडे लावण्यात आली आहेत. येत्या महिनाभरात रोपांचे लक्ष्य गाठणे शक्य होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.