वरदायिनी कुरनूर धरणावर ‘अंधार’ 50 दिव्यांवर चोरांचा डल्ला: रात्रीच्या वेळी प्रवास ठरतोय धोकादायक
By admin | Updated: April 10, 2015 23:29 IST
शंभूलिंग अकतनाळ/ चपळगाव :
वरदायिनी कुरनूर धरणावर ‘अंधार’ 50 दिव्यांवर चोरांचा डल्ला: रात्रीच्या वेळी प्रवास ठरतोय धोकादायक
शंभूलिंग अकतनाळ/ चपळगाव : 822 टीएमसी क्षमता असलेली आणि अक्कलकोटची वरदायिनी ठरलेल्या कुरनूर धरणावरील रस्त्यावर अंधारात उजेड पडावा म्हणून दिवे बसविण्यात आले. यातील 50 सौर व पथदिव्यांवर चोरांनी डल्ला मारल्याने धरणासह रस्त्यावर ‘अंधार’ पसरला आहे. यामुळे रात्रीचा प्रवास धोकादायक ठरत आहे.अक्कलकोट तालुक्यातील कुरनूरजवळ बोरी मध्यम प्रकल्पावर धरण बांधले. त्या धरणावरच कुरनूर, बावकरवाडी, मोट्याळ यासह तालुक्यातील उत्तर व ईशान्य भागाला जोडणारा हा रस्ता आहे. रात्री सुखकर प्रवास व्हावा आणि धोका होऊ नये, यासाठी 40 सौरदिवे, 10 पथदिवे बसविण्यात आले. दोन वर्षांत 50 पैकी काही दिव्यांमधील बॅटर्या चोरीला गेल्या तर काहींची नासधूस करण्यात आली. यामुळे धरणावर अंधार पसरला. पाणी सोडताना अडचण होऊ नये, यासाठी 10 पथदिवे बसविण्यात आले. धरणाची खोलीची पातळी 15-20 मीटर इतकी आहे. असे असताना एकही पथदिवा चालू नाही. यामुळे रात्री विद्युतपंप चालू करण्यास जाणार्या शेतकर्यांना जीव मुठीत धरूनच धरणावर जावे लागत आहे. सोलर पळविलेसौरदिव्यांवरील बॅटर्यांची चोरी झाली आहे तर काही दिवे फोडलेल्या अवस्थेत आहेत. काही दिव्यांवरील सोलर उचकटून टाकण्यात आले आहे. एवढी भयानक अवस्था या दिव्यांची झाली आहे. पथदिव्यांचे फ्यूज, ताराही चोरीला गेल्या आहेत. कोट:::::::::::::::धरणावरील दिव्यांबाबत वरिष्ठांशी पत्रव्यवहार केला आहे. याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. सुरक्षेसाठी गत दोन वर्षांपासून चौकीदार नेमण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे करण्यात येत आहे. मात्र त्यांनी याकडे लक्ष दिले नाही आणि देत नाहीत.-नागनाथ उदंडे,बीटधारक, बोरी मध्यम प्रकल्पकोट:::::::::::धरणावरील बॅटर्या, वायरी, फ्यूज चोरीला गेले असून, याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनीही चौकीदार नेमण्याचा सल्ला दिला आहे. वरिष्ठ विभागाशी संपर्क केल्यानंतर त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. चौकीदार नसल्याने अशी स्थिती निर्माण झाली आहे.-भारत बटगेरी,शाखा अभियंता, बोरी मध्यम प्रकल्प