शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

5000 भारतीयांना "अ‍ॅमेझॉन" देणार नोक-या

By admin | Updated: May 3, 2017 16:00 IST

ई-कॉमर्समधील आघाडीची कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉननं आता भारतात हातपाय पसरण्यासाठी पाऊल उचललं आहे.

ऑनलाइन लोकमत बंगळुरू, दि. 3 - ई-कॉमर्समधील आघाडीची कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉननं आता भारतात हातपाय पसरण्यासाठी पाऊल उचललं आहे. अ‍ॅमेझॉन भारतात जवळपास पाच हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याची माहिती बिझनेस स्टँडर्डनं दिली आहे. अ‍ॅमेझॉन या कंपनीनं ग्राहकांना वस्तू लवकरात लवकर घरपोच मिळाव्यात, यासाठी गोदामांच्या संख्येत वाढ करण्याची तयारी दर्शवली आहे. कंपनीचा 14 नवी गोदामे आणि सेवा केंद्रे सुरू करण्याचा विचार आहे. यामुळे कंपनीच्या वस्तू साठवून ठेवण्याच्या क्षमतेत वाढ होऊन अनेकांना नोक-या मिळणार आहेत, असे कंपनीचे म्हणणे आहे. वाढीव गोदामांमुळे कंपनीच्या ग्राहकांना अधिक जलद सेवा मिळण्याची शक्यता आहे. तसेच विक्रेत्यांनाही स्वतःची विविध उत्पादने विकता येणार आहेत. अ‍ॅमेझॉनकडून सण-उत्सवांच्या वेळी अतिरिक्त मनुष्यबळ वाढवण्यात येणार आहे. मात्र या केंद्रांवरील रोजगारनिर्मिती ही स्वतंत्रपणे राबवली जाणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. अ‍ॅमेझॉन इंडियाच्या कस्टमर फुलफिलमेंट विभागाचे अध्यक्ष अखिल सक्सेना यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "आम्ही गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने भारतात आमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहोत. या वाढीव केंद्र आणि गोदामांमुळे आमच्या ग्राहकांना जलद वेगाने सेवा देणे शक्य होणार आहे. यंदा सुरू होणाऱ्या सात गोदामांमध्ये मोठं सामान आणि फर्निचर ठेवण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच इतर तीन केंद्रांमार्फत कंपनी आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्यांतदेखील विस्तार करू पाहत आहे. एकंदरीत या केंद्रांसाठी नेमकी किती गुंतवणूक केली जाणार आहे, याबाबत कंपनीनं अजूनही काहीही वाच्यता केलेली नाही.