शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशातील ५० जिल्हे भूकंपप्रवण; धोक्याची घंटा

By admin | Updated: May 1, 2015 01:58 IST

नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपाने सीमेवरील उत्तर प्रदेशलाही धोक्याचा इशारा दिला आहे. या राज्यातील एकूण ७५ जिल्ह्णांपैकी ५० जिल्हे भूकंपप्रवण आहेत.

लखनौ : नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपाने सीमेवरील उत्तर प्रदेशलाही धोक्याचा इशारा दिला आहे. या राज्यातील एकूण ७५ जिल्ह्णांपैकी ५० जिल्हे भूकंपप्रवण आहेत.गृह मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेने (एनआयडीएम) झोन ४ अंतर्गत भूकंपाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या २९ जिल्ह्णांची यादी तयार केली आहे. संस्थेने राज्याचे तीन क्षेत्रात विभाजन केले आहे. नेपाळ आणि उत्तराखंडमधील उत्तरकाशीला लागून असलेल्या भागाचा समावेश झोन-४ मध्ये करण्यात आला आहे. नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाची तीव्रता बघितल्यानंतर उत्तर प्रदेश भूकंपापासून किती सुरक्षित आहे, याचा नव्याने विचार करण्याची गरज शास्त्रज्ञांना वाटली. कारण या भूकंपाचे धक्के उत्तर प्रदेशालाही बसले होते. नेपाळमधील भूकंपानंतर बाराबंकी, कुशीनगर, संत कबीरनगर, बदायू, श्रावस्ती, बलिया आणि गोरखपूर जिल्ह्णात अनेक हादरे बसले.‘उत्तर प्रदेशातील वाढत्या शहरीकरणामुळे भविष्यात फार मोठी जीवहानी होऊ शकते. यावेळी नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाचे धक्के सुदैवाने राज्यात तेवढ्या तीव्रतेने जाणवले नाहीत. परंतु राज्यात नियमांचे पालन होत नाही. उंच इमारती भूकंपरोधी असणे अत्यावश्यक आहे’, अशी माहिती भूकंप विशेषज्ञ आणि भारतीय भूसर्वेक्षण विभागाचे माजी संचालक व्ही.के. जोशी यांनी दिली.उत्तर प्रदेशात ८० वर्षात प्रथमच अशाप्रकारचे धक्के अनुभवण्यास आले. उत्तर आणि पश्चिम भागात अधिक तीव्रतेच्या भूकंपाचा परिणाम जास्त जाणवतो. नेपाळ: मदतीचा ओघ सुरूचभारतातर्फे नेपाळमधील भूकंपग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरूच असून गुरुवारी ८,४५० तंबू नेपाळला पाठविण्यात आले. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार विविध निमलष्करी दलांकडून हे तंबू घेण्यात आले आहेत. यापैकी ७५० तंबू विमानाने पाठविण्यात आले. भूकंपात घरे उद्ध्वस्त झालेल्या लोकांना या तंबूंचे वाटप केले जाईल.‘भूकंपग्रस्त नेपाळच्या गरजेनुसार आम्ही सर्वतोपरी सहकार्य करीत आहोत. भारतीय वायुसेनेलासुद्धा त्यांच्या मागणीनुसार मदत करण्यास सांगण्यात आले आहे आणि मदत मोहिमेचा वेगही त्या देशाच्या इच्छेवर अवलंबून असेल.’मनोहर पर्रीकरसंरक्षण मंत्री४पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून भारतात नुकत्याच आलेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला. मोदी यांनी टिष्ट्वट करून ही माहिती दिली. शरीफ यांनी नेपाळमधील बचाव कार्यात भारताद्वारे करण्यात येत असलेल्या मदतीचीही प्रशंसा केली. सार्क देशांनी आपत्तीतील बचाव व मदतीवर नियमित संयुक्त सराव केला पाहिजे,अशी सूचना शरीफ यांनी केली.