शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

हिमस्खलनातून सुटका केलेले ५ जवान मृत

By admin | Updated: January 31, 2017 05:12 IST

मच्छील सेक्टरमध्ये बर्फाखालून सुटका करण्यात आलेल्या पाच जवानांचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील तीन जणांचा समावेश आहे.

श्रीनगर : मच्छील सेक्टरमध्ये बर्फाखालून सुटका करण्यात आलेल्या पाच जवानांचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील तीन जणांचा समावेश आहे. बर्फाखाली अडकलेल्या जवानांची त्याच दिवशी सुटका करण्यात आली. तथापि, खराब हवामानामुळे त्यांना श्रीनगरला हलविता आले नाही वा वैद्यकीय मदत त्यांच्यापर्यंत पोहोचविता आली नाही. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जाते. आजही हवामान ठीक नव्हते. मात्र, लष्करी वैमानिकांनी मोठ्या हिमतीने जखमी जवानांना श्रीनगरला हलविले. तरीही उपचारादरम्यान पाचही जणांचा मृत्यू झाला. याआधीही हिमस्खलनात राज्यातील तीन जवान मरण पावले होते. गेल्या आठवड्यात गुरेझ सेक्टरमधील हिमस्खलनात शहीद झालेल्या १४ सैनिकांचे मृतदेहही सोमवारी श्रीनगरला आणण्यात आले. येथून ते त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात येणार असून, तेथे त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. या जवानांचा नियंत्रण रेषेजवळील गुरेझ सेक्टरमध्ये (जि. बांदिपुरा) २५ जानेवारी रोजी मृत्यू झाला होता. तथापि, खराब हवामानामुळे त्यांचे मृतदेह पाठविता आले नव्हते, असे लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले. लष्करी वैमानिकांनी माछील आणि गुरेझ सेक्टरमध्ये पोहोचण्याचा गेल्या आठवड्यात अनेकदा प्रयत्न केला. मात्र, बर्फवृष्टीमुळे त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. आज त्यांना यश आले. त्यांनी ५ जखमी जवानांसह १४ जवानांचे मृतदेह श्रीनगरला आणले. गेल्या सहा दिवसांत काश्मिरातील हिमस्खलनात एका अधिकाऱ्यासह २० सैनिक शहीद झाले. सेचच पाच नागरिकही अशाच दुर्घटनांत मृत्युमुखी पडले. गेल्या आठवड्यात तुफान बर्फवृष्टी झाली. त्यामुळेच जखमी जवानांना श्रीनगरला हलविता आले नव्हते.शहिदांत तीन महाराष्ट्राचे जवान माछील सेक्टरमधील हिमस्खलनात मरण पावलेल्या जवानांत महाराष्ट्रातील तीन जवानांचा समावेश आहे. गणेश किसन ढवळे, रामचंद्र शामराव माने आणि बालाजी भगवानराव अंबोरे, अशी त्यांची नावे आहेत. गणेश ढवळे (वय ३०) हे साताऱ्यातील वाई तालुक्याचे, रामचंद्र माने (वय ३४) सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ येथील, तर बालाजी अंभोरे (वय २६) मराठवाड्याच्या परभणी जिल्ह्यातील आहेत. तामिळनाडूच्या मदुराई येथील तमोतारा कन्नन (वय २७) आणि गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील देवा डाह्याभाई परमार (वय २७) यांचाही मृतांत समावेश आहे.