शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
5
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
6
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
7
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
8
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
9
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
10
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
11
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
12
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
13
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
14
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
15
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
16
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
17
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
18
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
19
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
20
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!

छतांवरील सौर पॅनल्ससाठी ५ हजार कोटी

By admin | Updated: December 31, 2015 02:52 IST

रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी रेल्वे मंत्रालय व राज्य सरकारांच्या संयुक्त प्रकल्प कंपन्यांची उभारणी करण्यास तसेच इमारतींच्या छतांवर सोलर पॅनल्स बसवून त्याव्दारे येत्या पाच वर्षांत

नवी दिल्ली : रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी रेल्वे मंत्रालय व राज्य सरकारांच्या संयुक्त प्रकल्प कंपन्यांची उभारणी करण्यास तसेच इमारतींच्या छतांवर सोलर पॅनल्स बसवून त्याव्दारे येत्या पाच वर्षांत ४,२०० मेगावॉट वीजनिमिर्ती करण्यासाठी पाच हजार कोटींची विशेष तरतूद करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. पुरेशी आर्थिक तरतूद नसल्याने भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे अनेक प्रकल्प वर्षानुवर्षे रखडले आहेत. अशा प्रकल्पांना राज्य सरकारांच्या अग्रक्रमानुसार वेगाने कार्यान्वित करण्यासाठी रेल्वे मंत्रालय व राज्य सरकार यांच्या संयुक्त प्रकल्प कंपन्यांची (स्पेशल पर्पज व्हेईकल-एसपीव्ही) उभारणी करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.अशा संयुक्त प्रकल्प कंपन्यांमध्ये दोन्ही सरकारच्या आर्थिक गुंतवणुकीखेरीज कंपनीच्या भागभांडवलात बँका, बंदरे, सरकारी कंपन्या, वित्तीय संस्था व खाण कंपन्यांनाहीसहभागी होता येतील. १00 कोटींच्या प्राथमिक निधीतून संयुक्त प्रकल्पांंचा प्रारंभ होईल. प्रत्येक राज्यांसाठी ५0 कोटींचे भांडवल रेल्वे मंत्रालय उपलब्ध करून देणार आहे. प्रकल्पांची मंजुरी सक्षम अधिकाऱ्यांमार्फत होईल. मंजुरी मिळाल्यावर संयुक्त कंपनीतर्फे आवश्यक निधीची उभारणी केली जाईल, असे या महत्वाकांक्षी निर्णयाचे स्वरूप आहे.स्मार्ट सिटीसाठी ‘नॉलेज पार्टनर’भारतात स्मार्ट सिटीज् प्रकल्प योग्यप्रकारे राबवण्यासाठी केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने न्यूयॉर्कच्या ब्लूमबर्ग फिलॉन्थ्रॉपिज कंपनीशी करार केला आहे. स्मार्ट सिटीज् प्रकल्पासाठी नॉलेज पार्टनर म्हणून ही कंपनी काम करणार असून प्रकल्प राबवतांना येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी ही कंपनी मदत उपलब्ध करून देणार आहे.स्वच्छ उर्जेला प्राधान्य देण्यासाठी आॅस्टे्रलियाबरोबर १३ नोव्हेंबर २0१५ रोजी झालेल्या असैन्य अणुकरारालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. जपानबरोबरही असाच करार सरकारने यापूर्वी केला आहे. (विशेष प्रतिनिधी)

सौर ऊर्जेचे धडक उद्दिष्टभारतात येत्या ५ वर्षात सौर उर्जेव्दारे ४२00 मेगावॅट वीजनिर्मितीचे केंद्र सरकारचे धडक उद्दिष्ट आहे. त्यासाठी राष्ट्रीय सोलर मिशनला प्रोत्साहन देण्याबरोबरच देशभर ग्रीडशी संलग्न ‘रूफ टॉप सोलर प्रकल्प’ विक्रमी वेगाने राबवण्याचा पर्याय सरकारने निवडला आहे. हा प्रयोग प्रभावीपणे रूजवण्यासाठी पूर्वीची ६00 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद थेट ५ हजार कोटींपर्यंत वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला.राज्य सरकारांना या योजनेव्दारे सर्वसाधारण प्रवर्गात ३0 टक्के तर विशेष प्रवर्गात ७0 टक्क्यांपर्यंत भांडवली खर्चापोटी अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.