शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या हॉटेलांवर ५ टक्के कर

By admin | Updated: March 6, 2017 04:17 IST

जीएसटी परिषदेच्या येथे झालेल्या बैठकीत दोन महत्वपूर्ण सहायक विधेयकांच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली.

नवी दिल्ली : जीएसटी परिषदेच्या येथे झालेल्या बैठकीत दोन महत्वपूर्ण सहायक विधेयकांच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली. सरकारने १ जुलैपासून जीएसटी लागू करण्याचे ठरविले आहे, अशी माहिती याबैठकीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. तथापि, ढाबे आणि छोटे हॉटेल व रेस्टॉरंट यासाठी ५ टक्के कर आकारण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत केंद्रीय जीएसटी (सी जीएसटी) व एकात्मिक जीएसटी (आय जीएसटी) यांच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली. परिषदेची पुढील बैठक १६ मार्च रोजी होणार आहे. यात राज्य जीएसटी व केंद्रशासित जीएसटी यासंबंधी विधेयकांच्या मसुद्याला अंतिम रुप देण्यात येणार आहे. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, सी जीएसटी व आय जीएसटी संसदेच्या बजट सत्राच्या दुसऱ्या टप्प्यात मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. ९ मार्चपासून अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर वस्तू व सेवांवर जीएसटी लागू करण्याचा अधिकार केंद्राला मिळणार आहे. तर, आय जीएसटी आंतरराज्यीय वस्तूंवर लागू होणार आहे. राज्य जीएसटी विधेयक प्रत्येक राज्याच्या विधानसभेत मंजूर करुन घ्यावे लागेल. तर, यूटी जीएसटी मंजुरीसाठी संसदेत ठेवण्यात येईल. जीएसटी १ जुलैपासून लागू करणे आता शक्य आहे, असे सांगून ते म्हणाले की, आम्हाला अशी अपेक्षा आहे की, विधेयक याच अधिवेशनात संसदेत मांडण्यात येईल. जीएसटी परिषदेने ठरवलेले दर कायममॉडल जीएसटी कायद्यात वस्तू व सेवा कराचे अधिकाधिक दर ४० टक्क्यांपर्यंत असेल. यातील २० टक्के केंद्राकडून तर २० टक्के राज्यांकडे असेल. अर्थात, जीएसटीचे दर हे पूर्वी मंजूर झाल्याप्रमाणेच ५, १२, १८ आणि २८ असतील. जीएसटी परिषदेने ठरविलेलेच दर कायम करण्यात येतील.