शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त विधानांमुळे खळबळ माजविणारे ५ नवे चेहरे संसदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 05:19 IST

मुंबई : नथुराम गोडसे याच्याबद्दलच्या अभिमानास्पद वक्तव्यामुळे उलटसुलट चर्चेचा विषय ठरलेल्या भाजपच्या प्रज्ञासिंह ठाकूर (भोपाळ) यांचा लोकसभेत लवकरच शपथविधी ...

मुंबई : नथुराम गोडसे याच्याबद्दलच्या अभिमानास्पद वक्तव्यामुळे उलटसुलट चर्चेचा विषय ठरलेल्या भाजपच्या प्रज्ञासिंह ठाकूर (भोपाळ) यांचा लोकसभेत लवकरच शपथविधी होईल. केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे (उत्तर कन्नड) आणि नलिन कुमार कटील (दक्षिण कन्नड) यांच्यासह समाजवादी पक्षाचे आझम खान (रामपूर), तेजस्वी सूर्या (बंगळुरू साऊथ) आणि सनी देओल (गुरुदासपूर) आदी वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले होते. अनंतकुमार वगळता सर्व जण नव्यानेच संसद सदस्य झाले आहेत.

बहुतांश राजकीय पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांपासून उमेदवारांपर्यंत अनेकांची वक्तव्ये गेल्या दीड-दोन महिन्यांत वादग्रस्त ठरली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बसपच्या प्रमुख मायावती, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यांमुळे खळबळ झाली.त्यापैकी प्रज्ञासिंह ठाकूर प्रथमच लोकसभेत प्रवेश करत आहेत. महात्मा गांधी यांचा खुनी नथुराम गोडसे याचा उल्लेख राष्ट्रभक्त असा केल्याने त्या वादग्रस्त झाल्या. दक्षिणेकडील भाजपचे उमेदवार नलिन कुमार यांनी गोडसे याने केलेल्या खुनाची तुलना दिवंगत कॉँग्रेस नेत्यामुळे झालेल्या कथित हत्यांशी केली. नंतर त्यांनी ते विधान काढून टाकले. बंगळुरू साऊथचे भाजप उमेदवार तेजस्वी सूर्या हेसुद्धा निवडून आले आहेत. त्यांनी वर्षभर वादग्रस्त विधाने केली.

गुरुदासपूरमधून भाजपतर्फे प्रथमच निवडून आलेले सनी देओल बालाकोट हल्ल्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही, असे म्हटल्याने तेसुद्धा काहीसे वादग्रस्त झाले.उत्तर कर्नाटकचे भाजप उमेदवार अनंतकुमार हेगडे हेसुद्धा गोडसे याच्याविषयी केलेल्या ‘टिष्ट्वट’मुळे वादात सापडले.पाकिस्तानी अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे आपल्या शापामुळे मरण पावले, या त्यांच्या विधानामुळे विशेषत: महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९