हैदराबाद : एका बापाने पैशांसाठी आपल्या अवघ्या १६ वर्षांच्या मुलीचा विवाह ओमानच्या ६५ वर्षीय शेखशी लावल्याचा धक्कादायक प्रकार मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीमुळेच उघडकीस आला आहे. आपल्या मुलीला मस्कतहून परत आणण्यात यावे, अशी विनंती केली आहे.मुलीची आई उन्निसा यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीमध्ये आपला पती सिकंदर व त्याची बहीण घोसिया या दोघांनी मुलीला ६५ वर्षाच्या शेखशी विवाह करण्यास भाग पाडले, असे म्हटले आहे. हा शेख रमझानच्या आधी हैदराबादला आला होता. मुलीचा शेखशी विवाह लावून देण्यास मी विरोध केला. पण नवºयाने काझीच्या मदतीने एका हॉटेलमध्ये मुलीचे लग्न लावून दिले असे उन्निसा यांचे म्हणणे आहे.मी विरोध केला असता, आपण तुमच्या मुलीला ५ लाख रुपयांना विकत घेतले असून, ती रक्कम सिकंदरला दिली आहे, असे शेखने सांगितले. ती सर्व रक्कम परत केल्यास, शेख मुलीला भारतात पाठवायला तयार आहे, असाही उल्लेख उन्निसा यांनी तक्रारीत केला.सिकंदरने मुलीला ओमानमधले ऐषारामी जीवनाचे व्हिडीओ दाखवले. शेखशी विवाह केल्यास असे आयुष्य जगता येईल असे स्वप्न दाखवल्यामुळे मुलगी लग्नाला तयार झाली असावी असे उन्निसाने पोलिसांना सांगितले. लग्नानंतर या शेखने मुलीसोबत चार दिवस हैदराबादमधल्या हॉटेलमध्ये मुक्काम केला. त्यानंतर शेख ओमानला निघून गेला आणि माझ्या मुलीला माझा नवरा म्हणजे सिकंदर त्याच्या बहिणीच्या घरी घेऊ न गेला. मी तिला परत आणण्याचा प्रयत्न केला असता, मला धमकावले. त्याने मुलीला ओमानला पाठवण्यासाठी पासपोर्ट, कागदपत्रांची जमवाजमव केली. तिला ओमानला पाठवले, अशी उन्निसाची तक्रार आहे. (वृत्तसंस्था)
रियाधमध्ये महिलेचे शोषणसौदी अरेबियातील रियाधमध्ये नोकरीसाठी गेलेल्या आपल्या बहिणीचे मानसिक व लैंगिक शोषण होत आहे, अशी तक्रार पीडित महिलेच्या बहिणीने केली आहे. तिच्या सुटकेसाठी सरकारने मदत करावी, अशी विनंती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे करण्यात आली आहे.हुमेरा ही पीडित महिला हैदराबादची रहिवासी आहे. आपल्या बहिणीला जेवण दिले गेले नाही, मारहाण करण्यात आली, डांबून ठेवण्यात आले आणि पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास ठार मारण्याची धमकी देण्यात आली, असे तिची बहीण रेश्मा हिने सांगितले.