शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात उष्माघातानं आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू

By admin | Updated: March 30, 2017 18:30 IST

गेल्या काही दिवसांपासून चैत्रातील उन्हाचे चटके जाणवू लागले असून, वातावरणातील उष्म्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 30 - गेल्या काही दिवसांपासून चैत्रातील उन्हाचे चटके जाणवू लागले असून, वातावरणातील उष्म्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे लोकांच्या जीव कासावीस होतोय. मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र व कोकण-गोव्याच्या काही भागांत तापमाननं कमालीचा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे लोकांना घराबाहेर पडणंही कठीण झालं आहे. त्यातच उष्माघातानं आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त एनडीटीव्हीनं दिलं आहे.मध्य आणि उत्तर महाराष्ट्राला या उष्म्याचा जास्त फटका बसल्याची माहितीही भारतीय हवामान खात्यानं दिली आहे. तर कोकणातल्या भिरा येथे मंगळवारी देशातील सर्वाधिक कमाल तापमान 46.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मालेगाव, सोलापूर, जळगाव येथे गेल्या काही दिवसांपासून तापमान 40 अंश सेल्सियसच्या वर जात होते. मंगळवारी नाशिक, सातारा ही तुलनेने थंड असलेल्या ठिकाणांवरही सर्वाधिक तापमान नोंदलं गेलं आहे. मात्र महाराष्ट्रात उष्णतेच्या लहरी नसल्याचं निर्वाळा देत हवेतील उष्णतेमुळे भीरामध्ये एवढं तापमान नोंदवण्यात आल्याची माहितीही भारतीय हवामान खात्याचे व्ही. के. राजीव यांनी दिली आहे. तसेच येत्या काही दिवसांत तापमानात अशीच वाढ राहणार असल्याचंही भारतीय हवामान खात्यानं सांगितलं आहे. त्याप्रमाणेच राजस्थानातील बारमेरमध्ये 43.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. हरियाणात 42 अंश सेल्सियस, उत्तर प्रदेशमधल्या वाराणसी, अलाहाबाद, हामीरपूर आणि आग्रा येथेही तापमान 40 अंश सेल्सियसच्या वर गेलं होतं. त्यामुळे उष्णतेची लाट आणखी काही दिवस देशभरात जाणवणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्यानं दिलं आहे.