शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ला ५ कोटी दंड

By admin | Updated: March 10, 2016 04:11 IST

शुक्रवारपासून तीन दिवस यमुनेच्या पात्रात अतिभव्य प्रमाणावर आयोजित केलेला जागतिक सांस्कृतिक महोत्सव रोखण्यास राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने बुधवारी नकार दिला

यमुना पात्राची नासाडी : हरित न्यायाधिकरणाचा आदेशनवी दिल्ली : आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या ‘आर्ट आॅफ लिव्हिंग फाउंडेशन’ने येत्या शुक्रवारपासून तीन दिवस यमुनेच्या पात्रात अतिभव्य प्रमाणावर आयोजित केलेला जागतिक सांस्कृतिक महोत्सव रोखण्यास राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने बुधवारी नकार दिला. मात्र या महोत्सवासाठी एक हजार एकरांहून अधिक जागेवर विनापरवाना बांधकाम करून यमुना पात्राची जी नासाडी करण्यात आली आहे तिची भरपाई करण्याची सुरुवातीची रक्कम म्हणून फाउंडेशनने पाच कोटी रुपये लगेच जमा करावे, असा आदेश न्यायाधिकरणाने दिला.एवढेच नव्हे तर या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे यमुना खोऱ्याचे पर्यावरण, परिसंस्था, जैवविविधता आणि जलचरजीवन यांचे जे नुकसान होत आहे त्यास फाउंडेशनच संपूर्णपणे जबाबदार असेल, असा निष्कर्षही न्यायाधिकरणाने काढला आणि याची भरपाई करून यमुना खोरे पूर्वपदावर आणण्यासाठी जो काही खर्च येईल तो सर्व फाउंडेशनलाच करावा लागेल, असेही बजावले. झालेल्या नुकसानीचा अंदाज घेणे व खोऱ्याच्या पुनरुज्जीवनाची योजना तयार करणे यासाठी न्यायाधिकरणाने एक तज्ज्ञ समितीही नेमली. पर्यावरणाच्या हानीची भरपाई म्हणून फाउंडेशनने अंतिमत: एकूण किती रक्कम द्यायची हे नंतर ठरविले जाईल, असे स्पष्ट केले गेले. याची सुरुवातीची रक्कम म्हणून फाउंडेशनने पाच कोटी रुपये कार्यक्रम सुरू होण्याआधी जमा करावे व नंतर ठरणाऱ्या अंतिम रकमेचा उर्व रित हिस्साही अदा करण्याची लेखी हमी दोन आठवड्यांत सादर करावी, असेही न्यायाधिकरणाने सांगितले.कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेले ४० फूट उंच, एक हजार फूट लांब व २०० फूट रुंद अशा महाकाय व्यासपीठासह इतर सर्वच हंगामी बांधकामांची सुरक्षितता आणि मजबुती याविषयी खातरजमा करून घेतल्याखेरीज व सर्व संबंधित विभागांकडून आवश्यक त्या परवानग्या घेऊन त्यातील अटींची पूर्तता केल्याखेरीज कार्यक्रम सुरु करता येणार नाही, असेही न्यायाधिकरणाने फाऊंडेशनला बजावले.याखेरीज दिल्ली विकास प्राधिकरण आणि दिल्ली प्रदूषण नियंत्रण मंडळ या वैधानिक संस्थांनी त्यांचे कर्तव्यपालन न केल्याबद्दल त्यांनाही अनुक्रमे पाच लाख व एक लाख रुपये दंड ठोठावण्यात आला.फाऊंडेशनच्या या कार्यक्रमाविरुद्ध मनोज मिश्रा, प्रमोद कुमार त्यागी, आनंद आर्य व ओजस्वी पार्टी इत्यादींनी याचिका केल्या होत्या. अध्यक्ष न्या. स्वतंत्र कुमार व सदस्य न्या. एम.एस. नाम्बियार, डॉ. डी. के. अग्रवाल व बिक्रम सिंह सजवान यांचा समावेश असलेल्या न्यायाधिकरणाच्या मुख्यपीठाने गेल्या दोन दिवसांच्या सुनावणीनंतर वरीलप्रमाणे अंतरिम आदेश दिला. एक तर अर्जदार फार उशिरा व ऐनवेळी आल्याने नियोजित कार्यक्रम आता अटळ असल्यासारखा आहे. शिवाय त्याने पर्यावरणाची जी काही हानी होईल ती भरून निघण्यासारखी आहे, असे नमूद करून न्यायाधिकरणाने कार्यक्रमाला मनाई न करता हा आदेश दिला.(लोकमत न्यूज नेटवर्क)