शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

४८ तास सर्च करून संपवली जीवनयात्रा

By admin | Updated: September 3, 2015 09:59 IST

आत्महत्या कशी करावी आणि आत्महत्येसाठीचा सर्वोत्तम मार्ग कोणता? याबाबत आपल्या स्मार्टफोनवरील गुगलवर ४८ तास सर्च करून ८९ वेबसाईट्स खंगाळल्यानंतर

बंगळुरू : आत्महत्या कशी करावी आणि आत्महत्येसाठीचा सर्वोत्तम मार्ग कोणता? याबाबत आपल्या स्मार्टफोनवरील गुगलवर ४८ तास सर्च करून ८९ वेबसाईट्स खंगाळल्यानंतर २६ वर्षांच्या ईशाने १३ मजली उंच इमारतीवरून उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना बंगळुरात उघडकीस आली.ईशा हांडा असे या तरुणीचे पूर्ण नाव आहे. फॅशन डिझायनर आणि डिझायनर कम वेलनेस कन्सल्टंट असलेल्या ईशाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, हे अद्याप अज्ञात आहे. मात्र आत्महत्येपूर्वी तब्बल ४८ तास ती गुगलवर आत्महत्येबाबत वेगवेगळी माहिती सर्च करीत असल्याचे तिच्या स्मार्टफोनवरून स्पष्ट झाले आहे. रविवारी रात्री येथील एचएसआर लेआऊटमधील शोभा क्लासिक अपार्टमेंटच्या १३ व्या माळ्यावरून कथितरीत्या उडी घेऊन ईशाने आपली जीवनयात्रा संपवली. आधी पोलिसांनी हत्येच्या अंगाने याप्रकरणाचा तपास केला. मात्र घटनास्थळी आढळून आलेल्या तिच्या स्मार्टफोनवरून तिने आत्महत्या केल्याची शक्यता बळावली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी ४८ तास तिच्या मनात आत्महत्येबाबतचेच विचार घोळत होते. आत्महत्या करण्यापूर्वी आत्महत्या कशी करावी, त्यासाठीचा प्रभावी मार्ग कोणता? यासाठीच्या तब्बल ८९ साईट्स तिने सर्च केल्या. विष प्राशन, झोपेच्या अतिरिक्त गोळ्या सेवन करणे, गळफास लावणे, रेल्वेसमोर उडी घेणे, श्वास रोखणे, इमारतीवरून उडी मारणे अशा आत्महत्येच्या अनेक मार्गांबद्दल तिने जाणून घेतले. या प्रत्येक मार्गाचा वापर आणि यातून वाचण्याची शक्यता किती, हेही तिने तपासले. सर्व पडताळणीनंतर कथितरीत्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्येचा मार्ग तिने निवडला. एवढेच नाही तर यानंतर इमारतीची उंची किती असावी, किती मजले असावे इथून तर उडी कशी घ्यावी, शहरातील उंच इमारती कोणत्या हेही तिने गुगल सर्चवर शोधले.यानंतर रविवारी सकाळी ती बाहेर पडली. सरजपूर व हारालूर मार्गांवरील उंच इमारतींचा तिने शोध घेतला. यानंतर एचएसआर लेआऊटमधील शोभा क्लासिक अपार्टमेंटची तिने निवड केली. ही इमारत नवी होती आणि फारशी सुरक्षा नसल्याने यात शिरणे सोपे होते, असे तिला वाटले व ती खोलीवर परतली. संध्याकाळी पुन्हा एकदा सोबतच्या मैत्रिणीला मी उशिरा परतेल असे सांगून ती घरातून निघाली आणि पुन्हा परतलीच नाही. (वृत्तसंस्था)