शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

४७ गावे झाली जलयुक्त

By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST

पुणे : टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाने नव्याने सुरू केलेली जलयुक्त शिवार अभियानामध्ये जिल्‘ातील २०० पैकी ४७ गावे जलयुक्त झाल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. १५ ऑगस्ट रोजी या गावांमध्ये झालेल्या ग्रामसभांत ही गावे जलयुक्त झाल्याचा ठराव करण्यात आला आहे.

पुणे : टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाने नव्याने सुरू केलेली जलयुक्त शिवार अभियानामध्ये जिल्‘ातील २०० पैकी ४७ गावे जलयुक्त झाल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. १५ ऑगस्ट रोजी या गावांमध्ये झालेल्या ग्रामसभांत ही गावे जलयुक्त झाल्याचा ठराव करण्यात आला आहे.
या योजनेंतर्गत २०० गावांची निवड करून ही गावे टंचाईमुक्त करण्याचा अराखडा तयार करण्यात आला आहे. राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रमात असलेली, तसेच ५० पेक्षा कमी पैसेवारी आलेली व टंचाईग्रस्त गावे यामध्ये निवडण्यात आली आहेत. जिल्‘ाच्या प्रत्येक तालुक्यातील १५ ते २० गावे घेण्यात आली आहेत.
यामध्ये अभियानात साखळी सिमेंट बंधारे, नालाबांध कार्यक्रम, नाला खोलीकरण, जल व कृषी संधारण, गाळ काढणे, विहीर पुनर्भरण, पाणी अडवणे व जिरवणे यासाठी चर खोदाई, अशी कामे करण्यात आली आहेत.
या २०० गावांमध्ये ७ हजार कामे हाती घेतली होती. यात कृषी, वन, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, पाणीपुरवठा, भूजल विभाग ही कामे करीत आहे. आजच्या परिस्थितीत जिल्‘ात ९० टक्क्यांपर्यंत ४७ गावांत कामे झाली आहेत. ५२ गावांत ५० ते ७० टक्के, ५० गावांत ३० ते ४० टक्के, २८ गावांत ३८ टक्क्यांपर्यंत कामे पूर्ण झाली आहे. यातील ९० टक्क्यांपर्यंत कामे ज्या गावांत झाली आहेत. ती गावे जलयुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आली आहेत.
ग्रामसभेत तसा प्रस्ताव ठेवण्यात येऊन आपल्या गावात या योजनेंतर्गत किती कामे व किती खर्च झाला, हे मांडण्यात आले. यावर कोणाच्या सूचना, हरकती, तक्रारी घेण्यात आल्या. यानंतर सर्वांच्या मते गाव जलयुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले.
कामांसाठी आतापर्यंत ६१ कोटी ७७ लाख इतका निधी खर्च करण्यात येत असून, ३० कोटींचा लोकसहभाग व ३२ कोटींची कामेही शासकीय निधीतून करण्यात येत आहेत. जवळपास पहिल्या टप्प्यातील हा निधी खर्च झाला आहे.