शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्राबाबूंचे आॅफिस ४६ व्या मजल्यावर, नव्या राजधानीतील सर्वोच्च जागा मुख्यमंत्र्यांसाठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 23:27 IST

विभाजनानंतर शिल्लक राहिलेल्या आंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी म्हणून उभारण्यात येत असलेल्या अमरावतीमध्ये मुख्यमंत्र्यांचे कार्यालय ४६ व्या मजल्यावर असेल. या कार्यालयातील खुर्चीत बसून मुख्यमंत्री संपूर्ण राजधानीचे विहंगम दृश्य पाहू शकतील.

हैदराबाद : विभाजनानंतर शिल्लक राहिलेल्या आंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी म्हणून उभारण्यात येत असलेल्या अमरावतीमध्ये मुख्यमंत्र्यांचे कार्यालय ४६ व्या मजल्यावर असेल. या कार्यालयातील खुर्चीत बसून मुख्यमंत्री संपूर्ण राजधानीचे विहंगम दृश्य पाहू शकतील.मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडू यांच्या स्वप्नातील अमरावतीचे बांधकाम दोन वर्षे युद्धपातळीवर सुरु असले तरी त्यात मुख्यमंत्र्यांचे कार्यालय नेमके कुठे असेल याची उत्सुकता होती. नगरपालिका प्रशासनमंत्री पी.नारायण यांनी शनिवारी ही उत्सुकता दूर केली. ४६ व्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयास जोडून हेलिपॅडही असेल. तेथून व्हीआयपी व परदेशी पाहुणे थेट ‘सीएमओ’मध्ये जाऊ शकतील.अमरावतीच्या केंद्रस्थानी पाच टोलेजंग इमारतींचे मुख्य प्रशासकीय संकुल असेल. यापैकी मधोमध असणारी इमारत ४६ मजल्यांची तर इतर चार इमारती प्रत्येकी ४० मजल्यांच्या असतील. मंत्री नारायण यांनी सांगितले की, अमरावतीची रचना करणाऱ्या सर नॉर्मन फॉस्टर या जनविख्यात आर्किटेक्टच्या फॉस्टर+पार्टनर्स या फर्मने या पाच मुख्य प्रशासकीय इमारतींचे अंतिम नकाशे सादर केले असून एप्रिलअखेर त्यांचे बांधकाम सुरु होईल. या पाच गननचुंबी इमारतींची मॉडेल आमदारांना पाहण्यासाठी विधानभवनात ठेवण्यात आलीहोती. (वृत्तसंस्था)असे असेल अमरावती शहरअमरावतीची विभागणी नऊ विभागांमध्ये असेल.प्रत्येक विभाग त्या उद्देशानुसार अमूक सिटी म्हणून ओळखला जाईल.यापैकी २१७ चौ. किमीवरील ‘अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह सिटी’ सर्वात मोठी असेल. त्यात वर उल्लेखलेल्या केंद्रस्थानच्या पाच टोलेजंग इमारतींखेरीज ८.५ लाख चौ. फूट क्षेत्रावर बांधलेली विधिमंडळाची इमारत असेल.‘जस्टिस सिटी’च्या मध्यभागी दोन लाख चौ. फुटांचे उच्च न्यायालय असेल.

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडू