४३ हजारांची भर, ३५ हजार वगळले मतदार नाव नोंदणी: १८ वर्षांचे नवमतदार ३१३३
By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST
नागपूर: १ ते १६ डिसेंबर २०१४ दरम्यान राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहिमेत एकूण ४३ हजार ६१३ नवीन नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली तर ३५ हजार ९४५ नावे यादीतून वगळण्यात आली. १८ वर्षांच्या एकूण ३१३३ तरुणांनी त्यांच्या नावाची नोंद केली.
४३ हजारांची भर, ३५ हजार वगळले मतदार नाव नोंदणी: १८ वर्षांचे नवमतदार ३१३३
नागपूर: १ ते १६ डिसेंबर २०१४ दरम्यान राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहिमेत एकूण ४३ हजार ६१३ नवीन नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली तर ३५ हजार ९४५ नावे यादीतून वगळण्यात आली. १८ वर्षांच्या एकूण ३१३३ तरुणांनी त्यांच्या नावाची नोंद केली.केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात आली होती. मतदार होण्यास पात्र सर्व नागरिकांनी त्यांच्या नावाची नोंद करण्यावर आयोगाने भर दिला आहे व त्यासाठी वेळोवेळी विशेष कार्यक्रमही राबविले जात आहेत. २१ जानेवारीला नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातील पुरवणी मतदार यादी (१ जाने. २०१५ अहर्ता दिनांकाच्या आधारे) प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात एकूण ३७ लाख १२ हजार ४४४ मतदार आहेत. त्यात १९ लाख २९ हजार ६४४ पुरुष तर १७ लाख ८२ हजार ७४७ स्त्री मतदारांचा समावेश आहे. इतर मतदारांची संख्या ५३ आहे. विशेष मोहिमेत ४३ हजार ६१३ नवीन नावे यादीत समाविष्ट करण्यात आली तर ३५ हजार ९४५ नावे यादीतून वगळण्यात आली.चौकटनागपूर जिल्हाएकूण मतदार -३७ लाख १२ हजार ४४४पुरुष मतदार -१९ लाख २९ हजार ६४४स्त्री मतदार -१७ लाख ८२ हजार ७४७इतर - ५३-०-०-०-०-विधानसभा मतदारसंघनिहाय मतदरमतदारसंघ मतदारकाटोल २,४८,८६२सावनेर २,७२,७९३हिंगणा ३,०८,७८७उमरेड २,६४,०१३द-पश्चिम ३,४३,५६७दक्षिण ३,४४,२९८पूर्व ३,३०,६५०मध्य २,९४,३५९पश्चिम ३,३२,१४९उत्तर ३,४१,६२१कामठी ३,८०,५८०रामटेक २,५०,७६५