शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर स्मारकासाठी ४२५ कोटींचा प्रस्ताव-

By admin | Updated: August 25, 2015 22:46 IST

आंबेडकरांच्या स्मारकारसाठी ४२५ कोटींचा प्रस्ताव

आंबेडकरांच्या स्मारकारसाठी ४२५ कोटींचा प्रस्ताव
मुंबई- दादर येथील इंदू मिलच्या जमिनीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे करण्याकरिता ४२५ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव सादर झाला आहे. प्रख्यात वास्तुविशारद शशी प्रभू यांनी हा प्रस्ताव दिला आहे. याखेरीज जेकब व मेकफर्लेन या फ्रेंच कंपनीनेही आपले आराखडे सादर केले असले तरी खर्चाचा तपशील सादर केलेला नाही.
शशी प्रभू यांचे सादरीकरण हे अधिक सखोल असून त्यांनी स्मारकाच्या खर्चाचा तपशील दिला आहे. प्रवेशद्वार, स्तूप, वाहनतळ क्र. १ व २, म्युझियम, वाचनालय, सभागृह, लोकांना एकत्र जमा होण्याचे ठिकाण आणि विविध सेवा याकरिता २३ हजार २९५ चौरस मीटर बांधकाम करण्याकरिता २१६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
सध्याचे बांधकाम पाडून टाकणे, आवार भिंत बांधणे, सौर ऊर्जेद्वारे पाणी उकळण्याची यंत्रणा बसवणे, मलनि:सारण व्यवस्था, पावसाचे पाणी साठवण्याची यंत्रणा निर्माण करणे, विद्युतीकरण अशा विविध कामांचा विचार करता ३८६ कोटी खर्च होणार असून शशी प्रभू यांची सल्लागार या नात्याने फी ३८ कोटी ६५ लाख रुपये असणार आहे.
स्मारकाच्या उभारणीबाबत निर्णय घेण्याकरिता मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यू.पी.ए. मदान यांना दिल्याचे समजते. (विशेष प्रतिनिधी)