शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशास लुटणार्‍या रिक्षाचालकासह चौघांना अटक ४० हजारांची रोकड जप्त : सरकारवाडा पोलिसांकडून पाच तासांत छडा

By admin | Updated: May 6, 2016 02:09 IST

नाशिक : ओळखीचा फायदा घेत अशोकस्तंभ येथून एका रिक्षाचालकाने व्यवसायानिमित्त नेहमी नाशकात येणार्‍या एका प्रवाशास गंगापूर गावाच्या पुढे नेऊन मारहाण करत लुटल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. या गुन्‘ाचा वेगाने तपास करत अवघ्या पाच तासांत सरकारवाडा पोलिसांनी रिक्षाचालकासह त्याच्या चार साथीदारांना अटक केली आहे.

नाशिक : ओळखीचा फायदा घेत अशोकस्तंभ येथून एका रिक्षाचालकाने व्यवसायानिमित्त नेहमी नाशकात येणार्‍या एका प्रवाशास गंगापूर गावाच्या पुढे नेऊन मारहाण करत लुटल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. या गुन्‘ाचा वेगाने तपास करत अवघ्या पाच तासांत सरकारवाडा पोलिसांनी रिक्षाचालकासह त्याच्या चार साथीदारांना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कृष्णा गंगय्या रेड्डी (२८, रा. दातवली, दिवा ) यांचा केटरिंग व्यवसाय आहे. यानिमित्त रेड्डी यांचे शहरात येणे-जाणे सुरू होते. ते २८ एप्रिलपासून शहरात होते. मंगळवारी (दि.३) दुपारी रेड्डी हे स्तंभावरून रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी रिक्षाचा शोध घेत होते. त्या दरम्यान, तोंडओळख असलेला रिक्षाचालक अक्षय दिलीप जाधव (२२, रा. राजवाडा, गंगापूर) याने रेड्डी यांच्याशी संवाद साधून ओळख सांगितली व रिक्षात बसविले. दरम्यान, भोजनाचे कारण देऊन त्यांचा विश्वास संपादन करत गंगापूर गावाच्या पुढे नेऊ न जाधव याने आपल्या काही साथीदारांना बोलावून घेत संध्याकाळच्या सुमारास रेड्डी यांना लाकडी दांडुक्यांनी मारहाण केली. त्यांच्याजवळील ऐंशी हजार रुपयांची रोकड, भ्रमणध्वनी हिसकावून घेत पळ काढला. सकाळी ते पुन्हा स्तंभावर आले व मल्हारखाण या भागात त्या रिक्षाचालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागले. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार रेड्डी यांना पोलिसांनी शोधून त्यांची विचारपूस केली असता त्यांनी घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर अवघ्या पाच तासांमध्ये सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोधपथकाने गुन्‘ाचा छडा लावून रिक्षाचालकासह चार संशयितांना अटक केली.
इन्फो........
दीड लाखांचा मुद्देमाल
उपआयुक्त एन. अंबिका, सहायक आयुक्त राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे व गुन्हे शोध पथकाने वेगाने तपास करत संशयित रिक्षाचालक व त्याचे साथीदार अजिंक्य सुधीर पवार (२२), विशाल राजू लोखंडे (२१), राहुल प्रकाश वाघमारे (२०), मंगेश श्यामराव गायकवाड (२२) यांना अटक केली. रिक्षा (एमएच १५, ईएच ३८३८), चोरीस गेलेल्या रोकडपैकी ४१ हजार रुपये रोख, बारा हजार रुपये किमतीचा सोनी कंपनीचा भ्रमणध्वनी, लाकडी दांडुके, आरोपींचे दोन भ्रमणध्वनी असा एकूण एक लाख ५४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या शुक्रवारपर्यंत (दि.६) पोलीस कोठडी सुनावली आहे.