नवी दिल्ली : दक्षिणेकडील केरळमध्ये मान्सूनचे पदार्पण केले असतानाच, संपूर्ण उत्तर भारतात मात्र गरमीने अंगाची काहिली होतआहे. गेले काही दिवस सतत उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच, सोमवारी संध्याकाळी उत्तर प्रदेश, बिहार व झारखंड या तीन राज्यांना वादळाने जोरदार तडाखा दिला. या तीन राज्यांत मिळून किमान ४0 बळी गेले.जखमींची संख्याही मोठी आहे. सर्वाधिक म्हणजे १७ जणांचामृत्यू बिहारमध्ये झाला. झारखंडमध्ये १३ आणि उत्तर प्रदेशमध्ये १0जण मृत्युमुखी पडले आहेत. वादळामुळे विजेचे खांब व झाडे कोसळून काही जण मरण पावले,तर काही जणांचा मृत्यूविजा कोसळल्याने झाला, असे सांगण्यात आले.बिहारमध्ये जीवितहानीबरोबरच वित्तहानीही प्रचंड झाली आहे. याची पाहणी करण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. अन्य दोन्ही राज्यांमध्येही जिथे सर्वाधिक मनुष्यहानी व वित्तहानी झाली. या वादळानंतर आज दिवसा पुन्हा तिथे कडक ऊनच होते.या तिन्ही राज्यांत मिळून १00 हून अधिक लोक जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या वादळामुळे अनेक वृक्ष पार कोलमडून पडले व त्यामुळे वाहतूकही ठप्प झाली. या महिन्याच्या सुरुवातीला असेच वादळ होऊ न याच तीन राज्यांत १५० हून अधिक लोक मरण पावले होते.येथे सूर्याचा कोप कायमदिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांबरोबरच व जम्मूत उष्णतेची लाटच पसरली असून, या सर्व भागांत तापमान ४५ अंशांच्या वर आहे. सर्व राज्यांमध्ये सकाळी १0 ते दुपारी ४ या वेळेत अगदी महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडा, सोबत पाणी घ्या, छत्रीचा वापर करा अशा सूचना दिल्या आहेत.
बिहार, झारखंड, यूपीमध्ये वादळाचा कहर, ४0 मृत्युमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 05:12 IST