शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

३९ आयएएस अधिकाऱ्यांची चौकशी

By admin | Updated: June 28, 2017 00:34 IST

भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहाराच्या आरोपांवरून ३९ आयएएस अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहाराच्या आरोपांवरून ३९ आयएएस अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.आयएएस अधिकाऱ्यांबाबत नोडल अ‍ॅथॉरिटीच्या स्वरूपात काम करणाऱ्या डिपार्टमेंट आॅफ पर्सनल अँड ट्रेनिंगमार्फत ही कारवाई केली जात आहे. या अधिकाऱ्यांबरोबरच केंद्रीय सचिवालय सेवेतील २९ अधिकारीही शिस्तभंगाच्या कारवाईचा सामना करीत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारींच्या आधारावर आणि सर्व्हिस रेकॉर्डचा आढावा घेतल्यानंतर ६८ अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. यात काही जण वरिष्ठ स्तरावर कार्यरत आहेत. केंद्र सरकार सेवा व प्रशासनाची पद्धत आणखी सुधारण्याच्या प्रयत्नांतर्गत आपल्या कर्मचाऱ्यांचा आढावा घेत आहे.नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा त्यांच्या सेवाकाळात दोन वेळा घेतला जातो. यातील पहिला नोकरीत निवड झाल्यानंतर १५ वर्षांनी आणि २५ वर्षांनंतर. काम न करणाऱ्या १२९ कर्मचाऱ्यांना मागील वर्षी केंद्र सरकारने सक्तीची सेवानिवृत्ती दिली. यात आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांचाही समावेश होता. कामचुकार कर्मचारी, अधिकाऱ्यांना शोधण्यासाठी ६७,००० जणांच्या सर्व्हिस रेकॉर्डची तपासणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यातील सुमारे २५,००० कर्मचारी देशभरातील व अ दर्जाचे आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, केंद्र सरकारच्या सेवेत ४८ लाख ८५ हजार कर्मचारी काम करीत आहेत.