शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमध्ये विषारी दारूचे ३८ बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 06:45 IST

आंध्रात सॅनिटायझर प्यायल्याने ९ जणांचा मृत्यू

अमृतसर /अमरावती (आंध्र प्रदेश ) : पंजाबच्या अमृतसर, बटाला आणि तरुणतारण या जिल्ह्यांमध्ये विषारी दारू प्यायल्याने ३८ जण, तर आंध्र प्रदेशच्या प्रकाशाम जिल्ह्यात सॅनिटायझर प्यायल्याने ९ जण मरण पावले असून, त्यामुळे दोन्ही राज्यांत खळबळ उडाली आहे. दोन्ही राज्यांत पोलिसांनी छापेमारी सुरू केली असून, काही जणांना अटकही केली आहे.

पंजाबमध्ये विषारी दारू बनवून, ती विकल्याबद्दल एका महिलेला अटक केली आहे. या धंद्याच्या सूत्रधारांचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पोलिसांचे विशेष तपास पथक स्थापन केले आहे. ही विषारी दारू आणखी काही जिल्ह्यांत विकली गेली आहे का, याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

लॉकडाउनच्या काळात पंजाबमध्ये दारूची दुकाने अनेक ठिकाणी बंद आहेत, तर काही ठिकाणी त्यावर निर्बंध आहेत. तसेच दारूचा काळाबाजारही सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी बेकायदेशीर हातभट्ट्या सुरू झाल्या आहेत. तेथूनच ही दारू विकली गेली असावी, असा अंदाज आहे. मात्र त्यात मुद्दाम विषारी द्रव्य मिसळण्यात आले की मिश्रणात चूक झाल्याने विषारी दारू तयार झाली, याचाही शोध पोलीस घेत आहेत. ही दारू स्वस्तात मिळाल्यामुळे लोकांनी ती प्राशन केली असावी, असे पोलिसांना वाटते आहे.

दारू न मिळाल्याने प्यायले सॅनिटायझरलॉकडाउनमुळे आंध्र प्रदेशातही दारूच्या विक्रीवर खूप निर्बंध आहेत. गावांमध्ये दारू मिळेनाशी झाल्याने अनेक ठिकाणी लोक सॅनिटायझर पिऊ लागले आहेत. प्रकाशम जिल्ह्यातील चेरीकुडी गावातील काही जणही सॅनिटायझर प्यायले आणि त्यातील ९ जण गुरुवार व शुक्रवारी या दोन दिवसांत मरण पावले. गेल्या काही दिवसांत दुकानांतून सॅनिटायझरची प्रचंड प्रमाणात विक्री वाढल्याचे आढळले आहे. मरण पावलेले सारे गरीब पुरुष असून, त्यात तिघे भिकारी आहेत.

टॅग्स :Punjabपंजाब