शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वैराग, ईलेवाडी, तुळशीदासनगर, मानेगाव ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी ३७ अर्ज दाखल

By admin | Updated: July 18, 2015 01:12 IST

४० जागा : सोमवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत

४० जागा : सोमवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत
बार्शी : तालुक्यातील वैराग, ईलेवाडी, तुळशीदासनगर व मानेगाव या चार ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवार अखेर वैरागच्या 17 जागांसाठी 28, ईलेवाडीच्या 7 जागांसाठी 6, तुळशीदासनगरच्या 7 जागंेसाठी 1 तर मानेगावच्या 9 जागांसाठी 2 अर्ज निवडणूक शाखेकडे दाखल झाले आहेत. सोमवार दि.20 रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे़
आज भूमकर गटाने निरंजन भूमकर यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्र.5 वगळता इतर प्रभागातून अर्ज भरले. तसेच इतरही काही इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. वैरागमध्ये 6 प्रभागातून ही निवडणूक होत आहे. प्रभाग 1 मधून किशोर इंगळे, राजकुमार पौळ, शाम कसबे, संगमेश्वर डोळसे, शोभा भालशंकर, रंजना भालशंकर, प्रभाग 2 मधून संजय भूमकर, दिलीप डोके, सुजाता डोळसे, लक्ष्मी डोके, सीताराम दिंडोरे, प्रभाग 3 मधून संतोष तोडकरी, सुनील कटके, मोहसीन शेख, श्रीशैल पाटील, चांदसाहेब शेख, योजना जाधव, प्रभाग 4 मधून हमीद पठाण, आदम पठाण, प्रमोदिनी क्षीरसागर, अश्विनी कटके प्रभाग 6 मधून राजकुमार पौळ, हणमंत पांढरमिसे, शहनाज शेख, रेहना शेख, जयश्री घोडके, अनुराधा पांढरमिसे यांनी अर्ज दाखल केले आहेत.
ईलेवाडी, मानेगावमध्ये बिनविरोधच्या हालचाली
ईलेवाडी ग्रामपंचायतीच्या 7 जागांसाठी निवडणूक होत असून प्रभाग 1 मधून रेखा काळे, अब्दुल तांबोळी, प्रभाग 2 मधून महादेव केसरे, प्रभाग 3 मधून भागीरथी शितोळे, सुनीता शिंदे, मच्छिंद्र तांबारे यांनी अर्ज दाखल केले आहेत. ईलेवाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तुळशीदासनगर ग्रामपंचायतीच्या 7 जागांसाठी निवडणूक होत असून येथून प्रभाग 2 मधून तृप्ती आतकरे यांचा एकमेव अर्ज आजअखेर दाखल आहे. मानेगाव ग्रा.पं.च्या 9 जागांसाठी निवडणूक होत असून येथून प्रभाग 1 मधून भारत ताटे, देविदास गायकवाड यांनी अर्ज दाखल केले आहेत. येथेही बिनविरोधच्या हालचाली सुरू आहेत.
चौकट
सोमवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत, दि.21 रोजी छाननी, दि.23 रोजी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असून त्याच दिवशी निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल. 4 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून दि.6 रोजी बार्शी येथे मतमोजणी होणार आहे. मानेगावसाठी आर. डी. मोरे, ईलेवाडीसाठी ए.एस.वसेकर, अल्ताफ चौधरी, तुळशीदासनगरसाठी विठ्ठल ठवरे तर वैरागसाठी श्रीशैल बशे˜ी, एम. डी. धेंडे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
चौकट
तालुक्यातील सर्वात मोठ्या वैराग ग्रामपंचायतीच्या 17 जागांसाठी निवडणूक होत आहे. भूमकर व निंबाळकर या पारंपरिक गटातच येथे आजवर निवडणूक होत आली आहे. सध्या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे संतोष निंबाळकर यांची सत्ता आहे तर वैराग जि़प़ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावेळी दोन गट पडण्याची शक्यता निर्माण झाली असून शिवसेना-राष्ट्रवादीचे दोन पॅनल व भाजपा (राजेंद्र मिरगणे गट) अशी चौरंगी लढत होण्याची शक्यता दिसत आहे़वैरागमध्ये शुक्रवारी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य निरंजन भूमकर गटाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत़ अद्याप विद्यमान सरपंच शिवसेनेचे संतोष निंबाळकर, तसेच भाजपागटाच्या वतीने अर्ज दाखल झाले नाहीत़