ऑनलाइन लोकमतभोपाळ, दि. १५ - मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे आतापर्यंत ३४ लोकांचा बळी गेला आहे. २,४८७ घरे जमीनदोस्त झाली तर १९,२३८ घरांचे अंशत: नुकसान झाल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. राज्यात १ जून ते १४ जुलैपर्यंत झालेल्या पावसाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता ३४ जिल्ह्यांत सरासरीहून अधिक, तर तीन जिल्ह्यांत कमी पाऊस झाल्याचे दिसून येते. राज्याच्या पूर्व भागात मुसळधार पावसामुळे ३४ जणांचा बळी गेला.
मध्यप्रदेशात पावसाचे ३४ बळी
By admin | Updated: July 15, 2016 21:52 IST