शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिन्यात ३२ हजारांवर मजुरांची वाढ! दुष्काळी परिस्थिती अन काम मागणी मेळाव्यामधून वाढतेय मजुरांची उपस्थिती

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

दीड महिन्यात ३२ हजारांवर मजुरांची वाढ!

दीड महिन्यात ३२ हजारांवर मजुरांची वाढ!
दुष्काळी परिस्थिती अन काम मागणी मेळाव्यामधून वाढतेय मजुरांची उपस्थिती
संतोष येलकर/ अकोला : दुष्काळी परिस्थिती आणि काम मागणी मेळाव्यांमधून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांवर मजुरांच्या उपस्थितीत वाढ होत आहे. गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत रोजगार हमी योजनेच्या कामांवर ३२ हजार ६९८ मजूर उपस्थितीत वाढ झाली आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, हातून गेलेली पिके, नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत मजुरांच्या हाताला काम मिळेनासे झाले. दुष्काळी परिस्थितीत मजुरांकडून कामाची मागणी होत आहे. त्यानुषंगाने शासनाच्या रोहयो विभागामार्फत अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ व वाशिम या पाचही जिल्ह्यात गत १ नोव्हेंबरपासून काम मागणी मेळावे घेतले जात आहेत. ऑक्टोबरअखेर अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात रोहयो कामांवर १६ हजार ९६५ मजुरांची उपस्थिती होती. १३ डिसेंबरपर्यंत पाचही जिल्ह्यात रोहयो कामांवरील मजुरांची उपस्थिती ४९ हजार ६६३ वर पोहोचली आहे.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
बॉक्स.............
विभागातील जिल्हानिहाय रोहयो कामांवरील मजूर उपस्थिती!
जिल्हा ऑक्टोबर १३ डिसेंबरपर्यंत
अकोला ११५५ ३२५८
अमरावती ९१५६ ३४७९८
यवतमाळ १६९७ १५७४
बुलडाणा २४६५ ३०६२
वाशिम २४६५ ६९७१
..........................................................................
एकूण १६९६५ ४९६६३
कोट..........
रोहयो विभागामार्फत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात काम मागणी मेळावे घेण्यात येत आहेत. या मेळाव्यांमध्ये मजुरांकडून काम मागणीपत्र घेण्यात येत आहेत. तसेच जॉबकार्डचे वाटप करण्यात येत आहे. या काम मागणी मेळाव्यांच्या माध्यमातून रोहयो कामांवर मजुरांच्या उपस्थिती वाढ होत आहे. गत ऑक्टोबर अखेरच्या तुलनेत १३ डिसेंबरपर्यंत विभागात रोहयो कामांवर ३२ हजारपेक्षा जास्त मजूर उपस्थितीत वाढ झाली आहे.
-पी.डी.हेडाऊ, कार्यकारी अभियंता (रोहयो), विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती
///////////////////////////////////////////////////////////////