शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
3
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
4
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
5
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
6
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
7
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
8
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
9
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
10
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
11
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
12
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
13
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
14
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
15
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
16
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
17
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
18
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
19
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
20
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!

२००३ पासून जम्मू-काश्मीरच्या हिंसाचारात ३१८ मुले मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:44 IST

जम्मू-काश्मीरमध्ये २००३ पासून आतापर्यंत म्हणजे १५ वर्षांत दरवर्षी सरासरी २६ मुले ठार झाली आहेत. लष्करी कारवाई, अतिरेकी हल्ले, अज्ञात बंदूकधाऱ्यांचा हल्ले, कचºयातील तोफगोळ्याचा स्फोट आणि भारत व पाकिस्तानी लष्करांचा तोफमारा यांत ही मुले मारली गेली आहेत.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये २००३ पासून आतापर्यंत म्हणजे १५ वर्षांत दरवर्षी सरासरी २६ मुले ठार झाली आहेत. लष्करी कारवाई, अतिरेकी हल्ले, अज्ञात बंदूकधाऱ्यांचा हल्ले, कचºयातील तोफगोळ्याचा स्फोट आणि भारत व पाकिस्तानी लष्करांचा तोफमारा यांत ही मुले मारली गेली आहेत. या काळात ३१८ मुले ठार झाली असून, १४४ मुले लष्करांच्या गोळीबारात सापडून तर १४७ मुले अज्ञात बंदूकधाºयांकडून मारली गेली.जम्मू-काश्मिरात मुलांच्या संरक्षणासाठी कोणतीही कायदेशीर चौकट पाळली जात नाही. तसेच आरोपींविरुद्ध आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही, असे अहवालात म्हटले आहे. काश्मीरचे बांधकाममंत्री नईम अख्तर यांनी सांगितले की, मुलांची हत्या वा गोळीबारात मृत्यू ही राज्यातील मोठी शोकांतिका असून, त्यामुळे येथील जनजीवन, मालमत्ता, शांतता व अर्थव्यवस्था अशा सर्वच पातळ्यांवर गंभीर परिणाम होत आहेत. (वृत्तसंस्था)मुलांवरील अन्य गुन्ह्यांचाही उल्लेख‘जेकेसीसीएस’ने जारी केलेला हा अहवाल ६३ पानांचा आहे. जम्मू-काश्मिरात गेल्या १५ वर्षांत मुलांविरोधातील हिंसाचाराचा त्यात आढावा घेण्यात आला आहे. त्यात मुलांची हत्या तसेच मुलांविरोधातील अटक, सामूहिक हिंसाचार आणि लैंगिक हिंसाचार यासारखे गुन्हे याचा तपशील देण्यात आला आहे.जम्मू काश्मीर कोअ‍ॅलिशन आॅफ सिव्हिल सोसायटी (जेकेसीसीएस) या मानवी हक्क संघटनेने जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.अहवालातील तपशिलानुसार, लष्करी कारवाईत ठार झालेल्या मुलांपैकी ११० मुलांना गोळ्या घातल्या गेल्या आहेत.या अहवालासाठी जेकेसीसीएसच्या संशोधक पथकांनी प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन तसेच वृत्तपत्रांतील बातम्यांच्या आधारे खातरजमा करून सलग १५ वर्षे अभ्यास केला आहे.ही फक्त जम्मू-काश्मीरची मुले नाहीत, ही भारताचीमुले आहेत. त्यांच्याकडे शत्रूची मुले या भावनेने नपाहता आपली मुले या भावनेने पाहिल्यास प्रवाहच बदलेल.काश्मीरकडे आपण मानवीय दृष्टिकोनातून पाहायला हवे; तरच ही शोकांतिका समजून घेता येईल.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर