ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. १७ - बलात्कार पिडित महिलेला ३१ हजार रुपयांत प्रकरण विसरण्याचे आदेश पंचायत समितीने दिले.
बलात्कारी नराधम हा पंचायत समितीतील सदस्य असल्याने पिडित महिलेला ३१ हजार रुपये देत प्रकरण मिटवण्याचा आदेश पंचायत समितीने दिला होता. परंतू, या प्रकरणाची वाच्यता पोलिसांत केल्यास ठार मारण्याची धमकी बलात्कारी नराधमाने दिली. या प्रकरणाची पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली नव्हती परंतू, स्थानिक प्रसारमाध्यमांनी पोलिसांत विचारणा केल्यावर पोलीस यंत्रणा कामाला लागली असल्याचे पिडित महिलेच्या वडिलांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात ही महिला नैसर्गिक विधी करता बाहेर गेली असता या नराधमाने महिलेचे अपहरण करत दोन दिवस
तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली असून बलात्कार करणा-या व्यक्तीवर गुन्हा नोंदवण्यात आल्याचे पोलीस अधिकारी विरेंद्र कुमार साहू यांनी सांगितले आहे.