शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

३,००० पेलेट काडतुसे डागली

By admin | Updated: August 19, 2016 05:16 IST

काश्मीर खोऱ्यात ८ जुलैपासून ३,००० पेलेट काडतुसे डागण्यात आली. प्रत्येक काडतुसात धातूचे ४५० छर्रे असतात. हिंसाचारादरम्यान सशस्त्र दले आणि निदर्शक दोघेही एका ठिकाणाहून

श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात ८ जुलैपासून ३,००० पेलेट काडतुसे डागण्यात आली. प्रत्येक काडतुसात धातूचे ४५० छर्रे असतात. हिंसाचारादरम्यान सशस्त्र दले आणि निदर्शक दोघेही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलत असल्यामुळे स्टॅण्डर्ड आॅपरेटिंग प्रोटोकॉल (एसओपी) पाळणे कठीण होते, अशी माहिती केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाला दिली. पेलेट गन (छर्ऱ्याची बंदूक)च्या वापरावर बंदीची मागणी करणाऱ्या याचिकेवर आपले म्हणणे मांडताना सीआरपीएफने गेल्या महिनाभरात खोऱ्यात वापरण्यात आलेल्या दारूगोळ्याचा तक्ता न्यायालयासमोर ठेवला. गेल्या महिन्यात हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वनी मारला गेल्यानंतर पंप अ‍ॅक्शन गन्सद्वारे .९ नंबरची ३,७६५ काडतुसे डागण्यात आली. एका काडतुसात सुमारे ४५० छर्रे असतात. म्हणजे सीआरपीएफने निदर्शकांवर ११ आॅगस्टपर्यंत १३ लाख छर्रे डागले. खोऱ्यातील विद्यमान निदर्शनांदरम्यान जमावाला नियंत्रित करण्यासाठी आपण कमी घातक आणि अजिबात घातक नसलेल्या १४ प्रकारच्या दारूगोळ्यांचा वापर केला. यात ओलेओरेसिन ग्रेनेड, पेपर बॉल्स, स्टन ग्रेनेडस् आणि इलेक्ट्रिक शेल्स यांचा समावेश होता, असे सीआरपीएफने न्यायालयाला सांगितले. ८ जुलै ते ११ आॅगस्टदरम्यानच्या निदर्शनादरम्यान अश्रुधुराच्या ८,६५० नळकांड्यांसह २,६७१ प्लास्टिक छर्यांचा वापर करण्यात आल्याचेही सीआरपीएफने न्यायालयाला सांगितले. ही माहिती केवळ सीआरपीएफने वापरलेल्या दारूगोळ्याची असून, जमावाला आवर घालण्यासाठी पोलिसांनी किती दारूगोळा वापरला याची माहिती त्यांनी अद्याप सादर केलेली नाही. एसओपीचे पालन करण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न केला. तथापि, परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही. टोकाच्या स्थितीत जमावाला आवर घालण्यासाठी शस्त्र वापरण्याची वेळ आलीच तर समोरच्यांच्या छातीखालील भागांवर मारा करावा, असे एसओपी सांगते; परंतु हिंसक निदर्शक, त्यांचे सतत हलणे व स्फोटक परिस्थिती यामुळे एसओपीचे पालन करणे शक्य झाले नाही, असेही सीआरपीएफने सांगितले. (वृत्तसंस्था)