शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

३०० वर्षे जुने उर्दू महाभारत लखनौतील मंजुल कुटुंबाकडे

By admin | Updated: October 2, 2015 23:29 IST

जुन्या लखनौतील करबाला कॉलनीतील मंजुल कुटुंबाला मौल्यवान खजिना गवसला आहे. आपल्या कुटुंबाकडे वारसारूपाने चालत आलेली ही संपत्ती एवढी मौल्यवान असेल

लखनौ : जुन्या लखनौतील करबाला कॉलनीतील मंजुल कुटुंबाला मौल्यवान खजिना गवसला आहे. आपल्या कुटुंबाकडे वारसारूपाने चालत आलेली ही संपत्ती एवढी मौल्यवान असेल याची कल्पनाही त्यांनी कधी केली नव्हती. या कुटुंबाकडे गेल्या पाच पिढ्यांपासून चालत आलेला हा अमूल्य ठेवा म्हणजे सुमारे ३०० वर्षांपूर्वी उर्दूत लिहिलेले महाभारत होय. पणजोबा मवाली हुसेन नसीरबादी यांनी रायबरेली या जन्मगावी आपल्या वाचनालयात हा ग्रंथ जतन करून ठेवला होता. तो परंपरेने फरमान यांच्याकडे चालत आला. विशेष म्हणजे उर्दूत लिहिलेल्या या महाभारतातील प्रत्येक प्रकरणात अरबी आणि पर्शियन भाषेत प्रस्तावना दिली आहे. फरमान यांची आई शहीन अख्तर यांनी या ग्रंथाची कहाणी सांगताना गेल्या पाच पिढ्यांपासून त्याचे जतन कुटुंबासाठी लाभदायी मानले आहे. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर हा ग्रंथ कुठेतरी हरविला होता, असे फरमान यांनी सांगितले. या कुटुंबाचे मित्र ‘कारी’ (धार्मिक शिक्षक) वहीद अब्बास यांनी हे पुस्तक तपशीलवार वाचले आहे. हे गंगा- जमुना परंपरेचे प्रतीक असून येणाऱ्या पिढ्यांसाठी जतन केले जावे, असे ते म्हणाले. हाजी तलीब हुसेन आणि त्यांचे मित्र दुर्गाप्रसाद यांनी उर्दू वाचकांसाठी हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाचे मूळ शिया इमाम हजरत अली नक्वी यांनी जतन केलेल्या पुस्तकांमध्ये आढळून येते, ते नंतर मंजूल कुटुंबाकडे आले. हा ग्रंथ म्हणजे केवळ शब्दश: अनुवाद नसून ते सोप्या गोष्टीरूपात लिहिलेले आहे. प्रत्येक प्रकरणात अरेबिक अवतरणांमध्ये माहिती दिली आहे, असे अब्बास यांनी नमूद केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)