३०... सारांश... जोड
By admin | Updated: January 30, 2015 21:11 IST
बुटीबोरी येथे भजन गायन स्पर्धा
३०... सारांश... जोड
बुटीबोरी येथे भजन गायन स्पर्धानागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुटीबोरी येथे पखवाज व हार्मोनियम भजन गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. शनिवारी सदर स्पर्धेचे उद्घाटन केले जाईल. या स्पर्धेतील प्रथम चार विजेत्यांना रोख बक्षिसे दिली जाईल. या स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. ***कालव्याच्या दुरुस्तीची मागणीनरखेड : तालुक्यातील मेंढला परिसरात जाम प्रकल्पाचा कालवा आहे. या कालव्यासाठी खोदकाम करण्यात आले असून, पक्के बांधकाम केले नाही. त्यात पाणी सोडल्यास ते मोठ्या प्रमाणात झिरपत असल्याने वाया जाते. त्यामुळे या कालव्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ***रेतीघाटाचा लिलाव करण्याची मागणीमौदा : तालुक्यातील सूर नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात रेती गोळा झाली आहे. त्यामुळे नदीचा प्रवाह मार्ग बदलविण्याची शक्यता निर्माण झाली असून, काही गावांना पुराचा धोकाही निर्माण झाला आहे. त्यामुळे या नदीवरील घाटांचे लिलाव करण्याची मागणी परिसरातील सरपंचांनी केली आहे. ***गिट्टीच्या ढिगाऱ्यांमुळे वाहतुकीस अडसरखात : परिसरातील रेवराळ - धर्मापुरी मार्गाच्या दुरुस्तीसाठी रोडच्या कडेला मोट्या प्रमाणात गिट्टी व मुरमाचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. त्यामुळे रोड अरुंद झाला असून, ढिगाऱ्यांमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. या मार्गाच्या दुरुस्तीला तत्काळ सुरुवात करून गिट्टी व मुरूम उपयोगी लावावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. ***