शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

३० टक्के वकिलांकडे नाही कायद्याची वैध पदवी

By admin | Updated: July 26, 2015 04:56 IST

देशातील न्यायालयांमध्ये काळा झगा घालून वकिली करणाऱ्या ३० टक्के वकिलांच्या कायद्याच्या पदव्या ‘लबाडी’ने मिळविलेल्या आहेत, अशी धक्कादायक माहिती बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या

चेन्नई : देशातील न्यायालयांमध्ये काळा झगा घालून वकिली करणाऱ्या ३० टक्के वकिलांच्या कायद्याच्या पदव्या ‘लबाडी’ने मिळविलेल्या आहेत, अशी धक्कादायक माहिती बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या अध्यक्षांनीच येथे एका कार्यक्रमात दिली.बार कौन्सिल ही वकिलांना वकिलीची सनद देणारी आणि चुकार वकिलांवर कारवाई करण्याचे अधिकार असलेली वैधानिक संस्था आहे. बार कौन्सिलने आयोजित केलेल्या वकिलांच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेत बोलताना अ.भा. बार कौन्सिलचे अध्यक्ष मन्नन कुमार मिश्रा यांनी ही माहिती देताना सांगितले की, सध्या न्यायालयांमध्ये वकिली करणाऱ्या ३० टक्के वकिलांकडे कायद्याची वैध पदवी नाही. अशा वकिलांना वकिली व्यवसायातून बाहेर काढण्याचे काम कौन्सिलने हाती घेतले आहे. दुसऱ्यांदा कौन्सिलचे अध्यक्ष झालेल्या अ‍ॅड. मिश्रा यांनी सांगितले की, असे बनावट वकील व कायद्याची पदवी घेऊन वकिली न करणारे (नॉन प्रॅक्टिसिंग) यांच्यामुळे वकिली व्यवसायाचे नाव खराब होत आहे. अशांना वेचून बाहेर काढले जाईल. वकिलांकडून, कोणत्याही कारणावरून केले जाणारे संप व न्यायालयीन कामावर टाकले जाणारे बहिष्कार याविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली. या संदर्भात त्यांनी सांगितले की, असे तंटे व वदा सोडविण्यासाठी बार कौन्सिलने त्रीस्तरिय तंटा निवारण यंत्रणेचा प्रस्ताव केला आहे. यात न्यायसंस्थेनेही सहकार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले. विधी सेवा प्राधिकरणांचे काम व्यवस्थित सुरूसध्याच्या परिस्थितीत विधी सेवा प्राधिकरणे नीटपणे कामे करीत नाहीत. परिणामी, सार्वजनिक निधीचा अपव्यय होत आहे. त्यामुळे या प्राधिकरणांंचे काम वकिलांकडे सोपवावे, असे मिश्रा यांचे म्हणणे होते. यासंदर्भात आपण केंद्रीय विधी व न्यायमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांची भेट घेतली असता त्यांनी या प्रस्तावावर विचार करण्याचे मान्य केले असून, त्यासंबंधीचे नियम बार कौन्सिलने तयार करावेत असे सांगितले आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. व्ही. गोपाळ गौडा यांनी मिश्रा यांच्या म्हणण्याचे लगेच खंडन केले. विधी सेवा प्राधिकरणांचे काम व्यवस्थित सुरू आहे व वकील आणि न्यायाधीश दोघेही त्याच्या यशाचे मानकरी आहेत, असे न्या. गौडा म्हणाले.