शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पाऊण तास पावसाने झोडपले नवीपेठ जलमय : मेहरूण तलावाच्या जलसाठ्यात वाढ

By admin | Updated: July 5, 2016 00:27 IST

जळगाव : शहरात सोमवारी दुपारी जवळपास पाऊण तास जोरदार पाऊस झाला. यामुळे नवीपेठेतील मोठा भाग, मुख्य रस्ते जलमय झाले. बजरंग बोगदा भागात तर पूरस्थिती निर्माण झाली होती.

जळगाव : शहरात सोमवारी दुपारी जवळपास पाऊण तास जोरदार पाऊस झाला. यामुळे नवीपेठेतील मोठा भाग, मुख्य रस्ते जलमय झाले. बजरंग बोगदा भागात तर पूरस्थिती निर्माण झाली होती.
जवळपास अर्धा तास पाण्याचा निचरा न झाल्याने रस्ते जलमय झाले. नवीपेठेत जयप्रकाश नारायण चौकात मद्रास बेकरीसमोर एवढे पाणी साचले की दुचाकी, पादचारी यांना मार्ग बदलावा लागला. चारचाकी नेतानाही अडचण येत होती. अशीच स्थिती गोलाणी मार्केटनजीक शिरपूर बँकेशेजारील मुख्य रस्त्यावर झाली होती.
तर गोलाणी मार्केटजवळील हनुमान मंदिरासमोर प्रचंड पाणी साचले. यामुळे फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या, दुकानांसमोर पाणीच पाणी झाले. ग्राहक, दुकानदारांना याचा मोठा त्रास झाला.

दुपारी ३ वाजता सुमारे १५ मिनिटे जोरदार पाऊस झाला. त्यानंतर ४.३० वाजता दमदार सरी कोसळू लागल्या. सायंकाळीदेखील अर्धा तास जोरदार पाऊस झाला.

बजरंग पूलाखालील वाहतूक बंद
जोरदार पावसामुळे बजरंग बोगद्यातून अधिक वेगाने पावसाचे पाणी वाहत होते. त्याची पातळी सतत वाढत होती. यामुळे या बोगद्याखालील वाहतूक बंद झाली. दुचाकी, रिक्षाचालक अशा सर्वांना पिंप्राळा रेल्वे गेट व गणेश कॉलनीमधून पुढे महामार्गावरून जावे लागले.

स्टेडियमजवळ पाणीच पाणी
स्टेडियम संकुलानजीक बसस्थानकाकडून येणार्‍या मुख्य रस्त्यावर प्रचंड पाणी साचले. गटारींमधून पाण्याचा निचरा होण्याची गती अतिशय कमी होती. त्यामुळे पाणी तुंबले होते.

मेहरूण तलावात जलप्रवाह
मेहरूण तलावामध्ये दक्षिण दिशेकडील स्त्रोतांमधून मोठ्या प्रमाणात जलप्रवाह सुरू झाला. यामुळे तलावाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली. हे दृश्य पाहण्यासाठी अनेक नागरिक, युवक मेहरूण तलावावर आले होते. तर अनेकांनी या पावसात भिजण्याचा आनंद लुटला.