शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ंंंंंंअग्नीशमन दलातील ३० टक्के कर्मचारी अपंग मनपाचा भोंगळ कारभार : ७० पैकी केवळ २५ कर्मचारी शारीरिकदृष्ट्या सक्षम

By admin | Updated: March 14, 2016 00:22 IST

जळगाव : मनपा अग्नीशमन दलात प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे सुमारे ३० टक्के अपंग कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ७० मधील उर्वरीत कर्मचार्‍यांपैकी केवळ २० ते २५ कर्मचारीच आगीच्या घटनेवेळी धावपळ करण्याची शारिरीक क्षमतेचे असल्याची माहिती अग्निशमन विभागातील सूत्रांनी दिली. त्यामुळे सुमारे ५ लाख लोकसंख्येच्या शहरात अग्नीशमन दलाची मदार केवळ २०-२५ कर्मचार्‍यांवरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जर आगीची मोठी घटना घडल्यास परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे मुश्कील होणार आहे. मनपा प्रशासनाचे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष होत आहे.

जळगाव : मनपा अग्नीशमन दलात प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे सुमारे ३० टक्के अपंग कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ७० मधील उर्वरीत कर्मचार्‍यांपैकी केवळ २० ते २५ कर्मचारीच आगीच्या घटनेवेळी धावपळ करण्याची शारिरीक क्षमतेचे असल्याची माहिती अग्निशमन विभागातील सूत्रांनी दिली. त्यामुळे सुमारे ५ लाख लोकसंख्येच्या शहरात अग्नीशमन दलाची मदार केवळ २०-२५ कर्मचार्‍यांवरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जर आगीची मोठी घटना घडल्यास परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे मुश्कील होणार आहे. मनपा प्रशासनाचे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष होत आहे.

इन्फो-१० ते १२ कर्मचार्‍यांनाच आग विझविण्याचे प्रशिक्षण
१.मनपा अग्नीशमन दलाचे गोलाणी मार्केटजवळील मुख्य कार्यालय तसेच अन्य तीन उपकेंद्र शहरात आहेत. या चार कार्यालयांसाठी ४ फायर फायटर आहेत. मात्र या विभागात चार केंद्र मिळून केवळ ७० कर्मचारी आहेत. त्यातील ३० टक्के कर्मचारी असे आहेत की त्यांना खाली वाकून पायपुसणे देखील उचलणे मुश्कील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर उर्वरीत कर्मचार्‍यांपैकी केवळ १० ते १२ कर्मचार्‍यांनाच आग विझविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहेत.

२.उर्वरीत कर्मचारी हे मनपातील विविध विभागात नको असलेले कर्मचारी बदली करून या विभागात टाकण्यात आले आहेत. मात्र त्यांची या कामासाठी आवश्यक असलेली शारीरिक क्षमताच नसल्याने आगीच्या घटनेवेळी धावपळ करणे, शिडीवर चढणे आदी चपळाईची कामे करणे या कर्मचार्‍याना शक्य होत नाही.

३.केवळ २०-२५ कर्मचारीच या कामासाठी शारिरीक दृष्ट्या सक्षम असल्याचे समजते. त्यामुळे या कर्मचार्‍यांवरच अग्नीशमन विभागाची मदार आहे.

इन्फो-
निधी मिळूनही साहित्य खरेदीस विलंब
अग्नीशमन दलासाठी शासनाकडून अग्नीशमन विभाग बळकटीकरणांतर्गत १ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. त्यातून आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठीचे साहित्य तसेच कर्मचार्‍यांसाठी गणवेश, १ रेस्क्यू व्हॅन, १ मिनी फायर फायटर आदी खरेदी प्रस्तावित आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. मात्र सुमारे एक-दीड वर्षापासून हा निधी प्राप्त झालेला असूनही तो खर्च झालेला नसल्याने नवीन निधी मंजूर असूनही मनपाला मिळू शकलेला नाही. एकीकडे मनपाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने निधीची चणचण असताना अग्नीशमन दलाच्या बळकटीकरणासाठी शासनाकडून निधी मिळत असूनही तो खर्च करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. हा विषय अनेक सभांमध्ये देखील गाजला आहे. तरीही अद्याप निविदा प्रक्रियाच सुरू आहे. अशा परिस्थितीत बळकटीकरण कसे होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.