तीन लाख ८२ हजार रुपये घेऊन चोरटे पसार गणेश कॉलनीमधील घटना : चोरीसाठी विना क्रमांकाच्या दुचाकीचा वापर
By admin | Updated: December 20, 2015 00:50 IST
जळगाव- कापूस विक्रीपोटी शहरातील एका व्यापार्याकडून पैसे घेऊन घरी जाणार्या शेतकर्याचे तीन लाख ८२ हजार ५०० रुपये विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी गणेश कॉलनीमधून लंपास केले. शनिवारी सायंकाळी ७.२५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
तीन लाख ८२ हजार रुपये घेऊन चोरटे पसार गणेश कॉलनीमधील घटना : चोरीसाठी विना क्रमांकाच्या दुचाकीचा वापर
जळगाव- कापूस विक्रीपोटी शहरातील एका व्यापार्याकडून पैसे घेऊन घरी जाणार्या शेतकर्याचे तीन लाख ८२ हजार ५०० रुपये विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी गणेश कॉलनीमधून लंपास केले. शनिवारी सायंकाळी ७.२५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. संजय दिनकर पाटील मूळ रा.बांबरूळ (महादेव) ता.भडगाव हे आपल्या १२ वर्षीय मुलीसह नवीन बीजे मार्केटमध्ये आपल्या भावाचे कापूस विक्रीसंबंधीचे तीन लाख ८२ हजार ५०० रुपये घेण्यासाठी सायंकाळी दुचाकीने (क्र.एमएच १९ बीबी ९७९०) सात वाजता गेले. या मार्केटमधील गाळा क्र.१९२ मधील रामा मोहन या दुकानातून त्यांनी तीन लाख ८२ हजार ५०० रुपये घेतले. रस्त्यात पपई घेण्यास थांबलेनवीन बीजे मार्केटमधून आपल्या भावाचे पैसे घेऊन पाटील यांनी कापडी पिशवीत ठेवले व ते आपल्या दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. पिशवी क्लचनजीक टांगली होती. पुढे ते गणेेश कॉलनीत जिल्हा बँकेच्या शाखेनजीक पपई घेण्यासाठी थांबले. त्यांनी दुचाकी पपई विक्रेत्यानजीकच एका रस्त्याला लावली. त्यावर त्यांची मुलगी बसलेली होती. पाटील पपई घेत होते. हात थोपटून मुलीचे लक्ष केले विचलितपाटील हे पपई घेत असतानाच मागून विना क्रमांकाच्या दुचाकीवरून दोन चोरटे आले. त्यांनी प्रथम मुलीच्या पाठीवर हळूच हात थोपटला. त्यात मुलीचे लक्ष काही क्षण विचलीत झाले, अशातच चोरट्यांनी क्लचनजीक टांगलेली पैशांची पिशवी काढली व ते सुसाट वेगात शिवकॉलनीकडे जाणार्या रस्त्याने पसार झाले. शिक्षणासाठी आलेय शहरातसंजय पाटील यांचे बंधू गावाकडे राहतात. तर पाटील हे मुलांच्या शिक्षणासाठी शहरात राहायला आले आहे. ते प्रेमनगरात भाड्याची खोली घेऊन राहतात. या प्रकरणी पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.