२९... नांद... विनयभंग
By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST
महिलेचा विनयभंग
२९... नांद... विनयभंग
महिलेचा विनयभंगआरोपीस अटक : नांंद येथील घटनानांद : महिलेस तिच्या घरी एकटे पाहून तिचा विनयभंग केल्याची घटना भिवापूर पोलीस नांद येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी सोमवारी तक्रार दाखल करण्यात आली असून, भिवापूर पोलिसांनी आरोपीस अटक केली.दिनेश मधुकर बावणे (२९, रा. नांद, ता. भिवापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दिनेश हा पीडित महिलेच्या घराच्या शेजारी राहतो. सदर महिला शुक्रवारी सायंकाळी तिच्या घरी एकटीच होती. त्याचवेळी दिनेश हा तिच्या घरी गेला आणि तिच्याशी स्वाभाविक चर्चा करू लागला. दिनेश हा तिचा शेजारी असल्याने तिला त्याच्या वागण्याचा संशय आला नाही. दरम्यान, तो आतल्या खोलीच्या दाराजवळ गेला आणि त्याने तिचा विनयभंग करून बळजबरी करू लागला. त्यामुळे तिने आरडाओरड करायला सुरुवात करताच तो पळून गेला. सदर प्रकाराची माहिती तिने लगेच तिच्या पतीला सांगितली. या प्रकरणी भिवापूर पोलिसांनी भादंवि ४५२, ३५४ अ (२) अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली. सदर घटनेचा तपास संजय पायक व गजघाटे करीत आहे. (वार्ताहर)***