२९... करवाही
By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST
(फोटो)
२९... करवाही
(फोटो)कत्तलखान्यात जाणाऱ्या ६८ गुरांना जीवनदानदोघांना अटक : दोन कंटेनर जप्त, रामटेक पोलिसांची कारवाईकरवाही : दोन कंटेनरमध्ये जनावरांना कोंबून मध्य प्रदेशातून नागपूर मार्गेे हैदराबाद येथील कत्तलखान्यात नेत असताना दोन्ही कंटेनर रामटेक पोलिसांनी पकडले. या कंटेनरमधील एकूण ६८ जनावरांची सुटका करून चालकांना अटक करीत दोन्ही कंटेनर जप्त केले. ही कारवाई रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांद्री नजीकच्या नागपूर - जबलपूर महामार्गावरील राज्य सीमा तपासणी नाक्याजवळ गुरुवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास करण्यात आली. सनाफ जहांगीरखान (३६, रा. किंग कॉलनी, हैदराबाद) व मसूद मो़हंमद मसूद अली (३४, रा. शाहीरनगर, हैदराबाद) अशी अटक करण्यात आलेल्या कंटेनरचालकांची नावे आहेत. दोन कंटेेनरमध्ये जनावरांची मध्य प्रदेशातून देवलापार मार्गे नागपूरकडे वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांना मिळाली होती. त्यांनी सदर प्रकाराची सूचना रामटेकचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दीपक साळुंके यांना दिली. साळुंके यांच्या नेतृत्वातील पथकाने कांद्री नजीकच्या राज्य सीमा तपासणी परिसरात नाकाबंदी करून मध्य प्रदेशातून देवलापार मार्गे नागपूरकडे जाणाऱ्या प्रत्येक मालवाहू वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. दरम्यान, एपी-२९/टीए-९५०० आणि एपी-२९/टीए-९४८१ क्रमांकाच्या दोन्ही कंटेनरची पोलिसांनी कसून तपासणी केली. त्यात जनावरे असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी कागदपत्रांची तपासणी करीत दोन्ही कंटेनरचालकांना ताब्यात घेतले. शिवाय, कंटेनरमधील जनावरांची सुटका केली. या दोन्ही कंटनेरमध्ये एकूण ६८ जनावरे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यातील तीन जनावरे मरणासन्न अवस्थेत होती, तर एका बैलाचा मृत्यू झाला.