शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२९... गुन्हे

By admin | Updated: December 27, 2014 23:38 IST

सहा चोरट्यांना अटक

सहा चोरट्यांना अटक
नागपूर : टॉवरचे केबल चोरून नेणाऱ्या सहा चोरट्यांना पारशिवनी पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पारशिवनी पोलिसांनी दिली.
बबलू शामराव झाडे (३०), रमेश रामसुहावन केसरकर (२४), मंजित माखनलाल यादव (२१), राजेश कुऱ्हे (२७) सर्व रा. वलनी, ता. सावनेर, अक्षय अशोक खंडेराव (२०) व मोहीत संजय बोरकर (२०) दोघेही रा. पिपळा (डाकबंगला) ता. सावनेर अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. पारशिवनी पोलीस ठाण्याच्या पिटोली शिवारात इंडस् कंपनीचे टॉवर आहे. या सहाही जणांनी संगनमत करून या टॉवरचे २०० मीटर केबल चोरून नेले होते. या केबलची किं मत २० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पारशिवनी पोलिसांनी भादंवि ३७९, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली. या सर्व चोरट्यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)
***
लोखंड चोरट्यांना अटक
खापरखेडा : खापरखेडा पोलिसांनी दहेगाव शिवारात गुरुवारी मध्यरात्री कारवाई करून तीन लोखंड चोरट्यांना अटक केली.
नदीम शब्बीर शेख (२६, रा. महादुला), गोलू ऊर्फ गोगा ऊर्फ कृष्णा रमेश शर्मा (रा. श्रीवासनगर, कोराडी) व अम्रपाल ऊर्फ ब्रह्मानंद पाटील (२३, रा. नवीननगर, पारडी, नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. या तिधांनी संगनमत करून फिर्यादीच्या घरासमोरील विहिरीवर ठेवलेली १४०० रुपये किमतीची लोखंडी जाळी आणि ३० हजार रुपये किमतीची एमएच-३१/डीवाय-७६०० क्रमांकाची ॲक्टिव्हा असा एकूण ३१ हजार ४०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. तिन्ही चोरटे दहेगाव शिवारात लपून बसले असल्याची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी त्यांना मोठ्या शिताफीने अटक केली. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी भादंवि ३७९, ४११, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. सदर घटनेचा तपास दुबे करीत आहे. (प्रतिनिधी)
***