२९... गुन्हे... जोड...०२
By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST
तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या
२९... गुन्हे... जोड...०२
तरुणाची विष प्राशन करून आत्महत्यानागपूर : तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सावनेर शहरातील पंचशीलनगरात सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.सुरेश हरिश्चंद्र खंडाते (३५, रा. पंचशीलनगर, सावनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुरेशने सोमवारी रात्री त्याच्या घरी विष प्राशन केले. सदर बाब लक्षात येताच त्याला सुरुवातीला सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. ***कामठीतील जुगार अड्ड्यावर धाडकामठी : स्थानिक पोलिसांनी कामठी शहरातील सैलाबनरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. यात चौघांना अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली. रमेश शंकर धुर्वे (३८), शेख सलाम शेख बब्बू (३५) व उमेश बाबुुराव सुखदेवे (३३०) तिघेही रा. सैलाबनगर, कामठी आणि मंगल मोहनलाल सुखदेवे (२३, रा. नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कामठी शहरातील सैलानगर येथे जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच कामठी पोलिसांनी तिथे धाड टाकली. दरम्यान, पोलिसांना जुगार खेळला जात असल्याचे लक्षात येताच चौघांना लगेच ताब्यात घेत त्यांच्याकडून एकूण ७९० रुपये रोख व जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी कामठी पोलिसांनी मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, रमेश चहारे, रवी अहीर, संजय गिते, विनोद कामळे, युवानंद कडू आदींनी केली. (तालुका प्रतिनिधी)***