शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

२७... वाडी

By admin | Updated: December 27, 2014 23:38 IST

(फोटो)

(फोटो)
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात आर्थिक संस्थांचे जाळे विणणार
देवेंद्र फडणवीस : बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेचे उद्घाटन
वाडी : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात आर्थिक संस्थांचे जाळे विणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या प्रमुखांची लवकरच बैठक आयोजित केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बँक ऑफ महाराष्ट्रच्या वाडी शाखेचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे कार्यकारी संचालक आर. आत्मराम होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. समीर मेघे, रिझर्व्ह बँकेचे क्षेत्रीय निदेशक जे. एम. जीवानी, क्षेत्र महाव्यवस्थापक पी. बी. अंभोरे, टी. व्ही. रमण मूर्ती उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, वाडी भागात व्यापार व उद्योग प्रगतिपथावर आहे. त्यामुळे या भागात बँक ऑफ महाराष्ट्रने शाखा सुरू करून ही कमी दूर केली आहे. ग्रामीण भागात बँकांचे जाळे विणल्यास शेतकऱ्यांना कर्जासाठी सावकारांकडे जावे लागणार नाही. त्यामुळे बँक व्यवस्थापनाने ग्रामीण भागात शाखा सुरू करण्यासंदर्भात गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. सध्या पुणे, ठाणे व मुंबई परिसरात बँकांमध्ये ६० टक्के गुंतवणूक होते. ती आता राज्याच्या इतर भागात होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. ज्या भागात बँकांच्या शाखा मोठ्या प्रमाणात आहेत, त्या भागात शेतकरी आत्महत्या करीत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात बँकांच्या शाखा सुरू करण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आर. आत्मराम यांनी शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विकास योजनांमध्ये सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. पी. बी. अंभोरे यांनी प्रास्ताविकातून बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले, बँक ऑफ महाराष्ट्रच्या एकूण १८६८ शाखांपैकी ११५३ शाखा महाराष्ट्रात आहेत. बँकेतर्फे राज्यातील सहा लाख ५० हजार शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जातो. पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत राज्यातील १० लाख चार हजार तसेच देशात १४ लाख ९१ हजार नागरिकांची बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखांमध्ये खाती उघडण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही खातेदारांना एटीएम कार्ड व पासबुकचे वितरण करण्यात आले. टी. व्ही. रमण मूर्ती यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
***