शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

२६/११ च्या हल्ल्यामुळे माझं आयुष्यच बदललं - रतन टाटा

By admin | Updated: December 2, 2015 13:41 IST

मुंबईवर २६/ ११ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर आपलं आयुष्यच बदलल्याची भावना विख्यात उद्योगपती रतन टाटा यांनी व्यक्त केली.

ऑनलाइन लोकमत
बडोदा, दि. २ - मुंबईवर २६/ ११ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर आपलं आयुष्यच बदलल्याची भावना विख्यात उद्योगपती रतन टाटा यांनी व्यक्त केली. 'बडोदा मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे रतन टाटा यांना सयाजी रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, त्यानंतर ते तरूणांशी संवाद साधत होते. 
'आयुष्यात मागे वळून बघितलं तर मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामुळे माझं आयुष्यचं बदलून गेल्याचं जाणवतं. त्या भीषण हल्ल्यानंतर मी तब्बल सहा महिने नीट बोलूही शकत नव्हतो, माझ्या आवाजात कंप जाणवयाचा, असं सांगणा-या  रतन टाटांच्या शब्दांमधून त्या हल्ल्याची भीषणता जाणवत होती. रोज संध्याकाळी मी रुग्णालयांमध्ये जाऊन हल्यात जखमी झालेल्यांना, त्यांच्या कुटुंबियांना भेटायचो. काही जणांकडे उपचाराचे पैसे देण्यासाठीही कोणी उरलं नव्हतं, हे माझ्या लक्षात आलं. त्यानंतर आम्ही सर्व ज्ञात व अज्ञात पीडितांच्या पुनर्वसनसाठी एका ट्रस्टची स्थापना केली असे सांगत त्या हल्लाने मला आणखी संवेदनशील बनवल्याचेही टाटांनी नमूद केलं.
यावेळी रतन टाटा यांनी भारत हे एक गुणवत्तेवर आधारित समान संधी देणार राष्ट्र म्हणून घडवण्याचे आवाहनही तरुणांना केले.
भारतीय इतिहासात अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असलेले बडोदा राज्याचे प्रभावशाली संस्थानिक सयाजी राजे तृतीय यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. टाटा हे हा पुरस्कार मिळालेले दुसरे व्यक्तिमत्त्व असून त्यांच्याआधी हा इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांना या पुरस्कारान गौरवण्यात आले होते.