शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांच्या २६ मालमत्ता जप्त

By admin | Updated: September 2, 2015 23:31 IST

हनुमाननगर झोनची कारवाई : वॉरंट बजावून २.४८ लाखाची वसुलीनागपूर : महापालिकेने थकबाकी वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. नेहरूनगर झोनच्या विभागीय कार्यालयाने थकबाकीदारांना वॉरंट बजावून बुधवारी २६ मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली. थकबाकी वसुलीसाठी झोन कार्यालयाच्या वॉरंट पथकाने वसुलीसाठी २६ जणांना वॉरंट बजावले. मालमत्ता जप्त करून त्यांच्याकडून. २.४८ लाखाची वसुली ...


हनुमाननगर झोनची कारवाई : वॉरंट बजावून २.४८ लाखाची वसुली
नागपूर : महापालिकेने थकबाकी वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. नेहरूनगर झोनच्या विभागीय कार्यालयाने थकबाकीदारांना वॉरंट बजावून बुधवारी २६ मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली.
थकबाकी वसुलीसाठी झोन कार्यालयाच्या वॉरंट पथकाने वसुलीसाठी २६ जणांना वॉरंट बजावले. मालमत्ता जप्त करून त्यांच्याकडून. २.४८ लाखाची वसुली केली. मालमत्ता जप्त करण्यात आलेल्यांची नावे अशी, श्यामराव तलवारे,वामनराव बनाईत, राजू शिर्दे, इंदूबाई भोगाडे, मनोहर भोगाडे, सुलोचना कापसे, विजय कापसे, सूरज कावडकर, पुरुषोत्तम बनारसे, प्रभाकर कडू, विश्वनाथ साठवणे, उषा इंगळे, राजेश दहिकर, माणिकरराव काटे, कांतीलाल चरडे, मीनाक्षी दुरुपकर, रहमानखान बिस्मील्लहा, ममता शाहू, ज्ञानेश्वर बोलके, विठ्ठल तिवाडे, आनंदराव चिंचघरे आदींचा समावेश आहे. मालमत्ता जप्त करण्यात आलेले व वॉरंट बजावण्यात आलेल्या मालमत्ता धारकांकडे ७ लाख ५५ हजारांची थकबाकी आहे. यातील काहींनी थकबाकीची रक्कम भरली.
जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता बाबत कोणत्याही स्वरुपाचे खरेदी - विक्रीचे व्यवहार करू नये असे दुय्यम निबंधक कार्यालयाला कळविण्यात आले आहे. संबंधित मालमत्ता धारकांनी थकबाकी न भरल्यास लिलाव करण्याचा इशारा झोनचे उपायुक्त महेश मोरोणे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)