शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

२५०० भारतीय सुखरूप परतले

By admin | Updated: April 27, 2015 23:18 IST

२५०० वर भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे सोमवारी संसदेत देण्यात आली.

नवी दिल्ली: विनाशकारी भूकंपाने हादरलेल्या नेपाळमध्ये आपल्या मदत मोहिमेची व्याप्ती वाढविताना तेथे अडकलेल्या २५०० वर भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे सोमवारी संसदेत देण्यात आली. याशिवाय नेपाळमध्ये अडकलेल्या आणि भारतात येण्यास इच्छुक विदेशी पर्यटकांसाठी मोफत व्हिसाची व्यवस्थाही करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. संसदेच्या दोन्ही सभागृहांत सकाळी कामकाज सुरू होताच शनिवारी नेपाळ आणि देशातील काही राज्यांत आलेल्या विनाशकारी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच या संकटसमयी शेजारील देशाला मदत पोहोचविण्यास भारताने दाखविलेल्या तत्परतेबद्दल सर्व सदस्यांनी सरकारची प्रशंसा केली. यावेळी विविध पक्षांच्या नेत्यांनी देशातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा बळकट करण्याचा सल्ला केंद्र सरकारला दिला. लोकसभेत संसदीय कामकाजमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर सर्व सदस्यांनी तो त्वरित मान्य केला. भारतात भूकंपात मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडा ७२ वर पोहोचला असून यात बिहार ५६, उत्तर प्रदेश १२ आणि राजस्थान व पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक जण मृत्युमुखी पडला आहे. या संकटसमयी संपूर्ण देश नेपाळच्या पाठीशी उभा आहे, अशी ग्वाही काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली. तसेच केंद्र सरकारने राज्यांना आपत्ती व्यवस्थापन दल स्थापन करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली. भूकंपाची सूचना पंतप्रधानांनी दिली देशाचा गृहमंत्री या नात्याने नेपाळ आणि देशातील काही राज्यांमध्ये आलेल्या भूकंपाची सूचना पहिले मला मिळायला हवी होती. परंतु सर्वप्रथम पंतप्रधानांनी मला याबाबत सूचना दिली, या केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसने कडाडून टीका केली. ‘गुप्तचर विभागाला अशा कुठल्याही घटनेची सूचना प्रथम पंतप्रधानांना आणि नंतर गृहमंत्र्यांना देण्याची सूचना देण्यात आल्या आहेत काय? कारण अशा प्रकरणात गृह मंत्रालयाला प्राधान्य दिले जात असते’, असा सवाल काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केला. सिंग यांची फिरकी घेताना ते म्हणाले, भूकंपानंतर लगेच नेपाळला मदत पोहोचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकाराची प्रशंसा करून या आपत्तीची पहिली सूचना पंतप्रधानांना मिळाली होती हे गृहमंत्र्यांनी कबूल केले आहे. सरकार गृहमंत्रालयाला फारसे महत्त्व देत नाही, हे यावरून स्पष्ट होते. ४राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासह (एनडीआरएफ)विविध भारतीय संस्थांनी नेपाळमध्ये मदतकार्यात बजावलेल्या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवरील संदेशात प्रशंसा केली. ४‘सेवा परमो धर्म’ हीच आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. भारताच्या १२५ कोटी जनतेने नेपाळचे दु:ख स्वत:चे मानत मदत देऊ केली आहे, असे ते संदेशात म्हणाले.४केरळचे शंभरावर पर्यटकांना परत आणण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले असून केरळचे मंत्री के.सी. जोसेफ समन्वय राखण्यासाठी दिल्लीला गेले असल्याची माहिती मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी तिरुवनंतपुरम येथे दिली.४भूकंपाबाबत सोशल मीडियाच्या माध्यमाने पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका; असे आवाहन दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले. देशवासीयांनी अजिबात घाबरण्याची गरज नाही. यासंदर्भात अधिकृत माहिती मिळाल्यास शासनातर्फे योग्य पावले उचलली जातील.अशी ग्वाही संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी दिली. ४देशात अनेक राज्यांना धक्का देणाऱ्या शक्तिशाली भूकंपातील मृत्यूसंख्या ७२ झाली असून भूकंपानंतरच्या शक्तिशाली धक्क्यांमुळे (आॅफ्टरशॉक)झालेल्या पडझडीत २८८ जण जखमी झाले. केरळचे शंभरावर पर्यटक नेपाळमध्ये अडकून पडल्याची माहिती मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी दिली आहे.४ दरम्यान केंद्राच्या आंतर मंत्रालयीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चमू नेपाळमध्ये मदतकार्यात समन्वय राखण्यासाठी पोहोचली आहे. सर्वाधिक झळ बिहारला बसली असून या राज्यात ५६, उत्तर प्रदेशात १२, प. बंगालमध्ये ३ तर राजस्थानमध्ये एकाचा मृत्यू झाला. ४भारताने ‘आॅपरेशन मैत्री’अंतर्गत नेपाळमध्ये मदतकार्य चालविले असून गृह, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चमू मदत आणि बचाव कार्यात समन्वय राखण्यासाठी काठमांडूला पोहोचला आहे. ४गृह मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव बी.के. प्रसाद यांच्या नेतृत्वातील चमू नेपाळमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेवरही निगराणी ठेवेल. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उच्चस्तरीय पथक नेपाळला पाठविण्याचा निर्णय झाला.