शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
4
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
5
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
6
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
9
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
10
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
11
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
14
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
15
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
16
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
17
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
20
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!

डेंग्यूप्रकरणी आरोग्यमंत्र्यांना २५ हजारांचा दंड

By admin | Updated: October 4, 2016 03:45 IST

राजधानी दिल्लीत डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या विरोधातील मोहिमेत सहकार्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नावाचा खुलासा

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या विरोधातील मोहिमेत सहकार्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नावाचा खुलासा करण्यासाठी शपथपत्र दाखल करण्यात अपयशी ठरलेल्या आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना, सर्वोच्च न्यायालयाने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाने जैन यांना सांगितले होते की, चिकुनगुनियाच्या मोहिमेत सहकार्य न केल्याबाबत ज्या अधिकाऱ्यांवर आरोप लावण्यात आलेला आहेत, त्यांच्या नावांचा खुलासा करा. न्या. मदन बी. लोकुर आणि न्या. धनंजय वाई चंद्रचूड यांच्या खंडपीठाने जैन यांना आता मंगळवारपर्यंत शपथपत्र दाखल करण्याचा आदेश दिला आहे, तर अधिकाऱ्यांवरील आरोप अतिशय गंभीर आहेत, असेही मत न्यायालयाने व्यक्त केले. तथापि, जैन यांच्या वतीने अ‍ॅड. चिराग उदय सिंह यांनी सांगितले की, जैन हे मंगळवारी शपथपत्र दाखल करतील. आम्हाला २४ तास द्या, अशी विनंती या वकिलांनी केली, तेव्हा न्यायालयाने त्यांना फटकारले की, लोक मरत आहेत आणि आपल्याला आणखी २४ तासांची गरजच पडायला नको. जैन यांनी असा आरोप केला होता की, राजधानी दिल्लीत डेंग्यू आणि चिकुनगुनियासारखे डासांमुळे पसरणारे आजार वाढत आहेत, पण अधिकारी सहकार्य करीत नाहीत आणि जबाबदारी घेत नाहीत. एका जनहित याचिकेवर न्यायालयाने दिल्ली सरकारला नोटीस जारी केली होती. जैन यांनी या नोटिसीला उत्तर देतानाही स्पष्ट केले होते की, आजाराला रोखण्यासाठी अधिकारी सहकार्य करीत नाहीत, तर जैन यांनी असेही स्पष्ट केले होते की, या आजारांशी संंबंधित फाइल मंजुरीसाठी नायब राज्यपाल यांच्याकडे पाठविण्यात येत आहे.