शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

कुमारस्वामींच्या मंत्रिमंडळात २५ नव्या मंत्र्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 02:20 IST

दोन आठवड्यांपूर्वी एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात काँग्रेसचे १४, सत्ताधारी जनता दलाचे (एस) नऊ आणि बहुजन समाज पक्ष व केपीजेपी यांच्या प्रत्येकी एक अशा २५ जणांना सामावून घेण्यात आले.

बंगळुरू : कर्नाटक मंत्रिमंडळाचा बुधवारी २५ मंत्र्यांचा समावेश करून विस्तार करण्यात आला. दोन आठवड्यांपूर्वी एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात काँग्रेसचे १४, सत्ताधारी जनता दलाचे (एस) नऊ आणि बहुजन समाज पक्ष व केपीजेपी यांच्या प्रत्येकी एक अशा २५ जणांना सामावून घेण्यात आले.राज्यपाल वजुभाई वाला यांनी नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. जनता दलाचे (एस) प्रमुख एच. डी. देवेगौडा यांचे चिरंजीव एच. डी. रेवण्णा व राज्य काँग्रेसचे वरिष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांचा शपथ घेतलेल्यांत समावेश आहे.काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा पराभव करून जायंट किलर ठरलेले जनता दलाचे (एस) जी. टी. देवे गौडा यांचाही मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. मंत्रिमंडळात काँग्रेसच्या जयमाला या एकमेव महिला आहेत. सत्तावाटप सूत्रानुसार काँग्रेसचे २२ तर जनता दलाचे १२ मंत्री असतील. सध्या मंत्रिमंडळात एकूण २७ मंत्री सामील झाले आहेत व अजून सात जागा रिक्त आहेत.जयनगरमध्ये जनता दल नाहीजयनगरमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत जनता दल आपला उमेदवार उभा करणार नाही. भाजपाचे उमेदवार विजयकुमार यांचे निवडणुकीआधी निधन झाल्याने मतदान पुढे ढकलावे लागले होते. जनता दलाने उमेदवार काले गौडा याला माघार घेण्यास सांगत काँग्रेस उमेदवारास पाठिंबा दिला आहे.

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामी