शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

२५ मिनिटात तीन सभा मनपा: तहकुब सभा घेतल्या पण आटोपत्या

By admin | Updated: December 23, 2015 23:57 IST

जळगाव : सफाई मक्त्याच्या वादानंतर दोन वेळा तहकूब झालेली महापालिका स्थायी समितीची सभा बुधवारी झाली मात्र तीन सभांचे कामकाज अवघ्या २५ मिनिटात आटोपले गेले.

जळगाव : सफाई मक्त्याच्या वादानंतर दोन वेळा तहकूब झालेली महापालिका स्थायी समितीची सभा बुधवारी झाली मात्र तीन सभांचे कामकाज अवघ्या २५ मिनिटात आटोपले गेले.
महापालिका स्थायी समितीची २० नोव्हेंबर रोजीची सभा सफाई मक्त्याच्या विषयावरून वादग्रस्त ठरली होती. प्रशासनाकडून शहराच्या सफाई सारख्या विषयावर गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने स्थायी सदस्यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले होते. यानंतर जोपर्यंत सफाई मक्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत सभेत न बसण्याचा निर्णय सदस्यांनी घेतला होता. त्यानंतर ११ डिसेंबर रोजी स्थायी समितीची सभा बोलविण्यात आली होती. या सभेतही प्रभाग निहाय सफाई कामाचा ठेका देण्याचा विषय आला नाही. त्यामुळे स्थायी सदस्य नितीन ल‹ा व अन्य सदस्य संतप्त झाले. नाराजी व्यक्त करत सदस्यांनी या सभेतूनही बहिर्गमन केले होते. त्यानंतर सफाई मक्त्याचा विषय प्रशासनाने गांभीर्याने घेऊन तो मार्गी लावला. त्यानंतर बुधवारी २३ रोजी दोन वेळा तहकूब झालेली व नियमित सभा सभापती नितीन बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजिण्यात आली होती.
विषयांना फारसा विरोध नाहीच
सभेत २० नोव्हेंबर व ११ डिसेंबर रोजी तहकूब झालेल्या विषयांचे वाचन नगरसचिव निरंजन सैंदाणे यांनी केले. त्याला तातडीने मंजुरी देण्यात आली. प्रारंभी सात प्रशासकीय प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. त्यानंतर नियमित पाच विषय मंजूर करण्यात आले. यानंतर २३ च्या नियमित सभेला सुरुवात झाली. तीत सहा विषय चर्चेला होते. त्यांनाही मंजुरी देण्यात आली. जलशद्धीकरणासाठी लागणार्‍या पिवळ्या तुरटीच्या विषयावर तिच्या दर्जाविषयी पृथ्वीराज चव्हाण यांनी शंका उपस्थित करून तो नियमित तपासला जावा अशा सूचना केल्या. यावर डी.एस. खडके यांनी तशी तपासणी होत असल्याचे स्पष्ट केले.
-----
भोसलेंचा विषय तहकूब
मनपातील तत्कालीन प्रभाग अधिकारी दिनकर भोसले यांच्यावरील गुरांचे चामडे प्रकरणातील आक्षेपांवरून त्यांच्या दोन वेतनवाढी कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. त्यावर त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ च्या तरतुदीचा आधार घेत स्थायी समितीपुढे अपिल केले आहे. मात्र सविस्तर चौकशी अहवाल सादर होईपर्यंत हा विषय घेऊ नये असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचविल्यानंतर हा विषय तहकूब ठेवला जावा अशा सूचना सभापती बरडे यांनी दिल्या.
----