२३... कोंढाळी
By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST
विहिरीत पडून पत्नीचा मृत्यू
२३... कोंढाळी
विहिरीत पडून पत्नीचा मृत्यूपती बचावला : कचारीसावंगा शिवारातील घटनाकोंढाळी : शेतातील विहिरीत पडलेल्या पत्नीला वाचविण्याच्या प्रयत्नात पतीही विहिरीत पडला. यात पत्नीचा बुडून मृत्यू झाला तर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने पतीला वाचविले. ही घटना कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कचारीसावंगा शिवारात शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. आशा प्रभाकर अडागळे (६०, रा. कचारीसावंगा, ता. काटोल) असे मृत पत्नीचे नाव असून, प्रभाकर अडागळे (६५, रा. कचारीसावंगा, ता. काटोल) असे बचावलेल्या पतीचे नाव आहे. प्रभाकर अडागळे याची पत्नी आशा ही शेतात भाजी तोडण्यासाठी गेली होती. दरम्यान, ती गावालगतच्या केशव पुणेकर यांच्या शेतातील विहिरीत पडली. ही बाब लक्षात येेताच प्रभाकर यांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेही विहिरीत पडले. स्थानिक पोलीस पाटील प्रमोद मेहर यांना कळताच त्यांची कोंढाळी पोलिसांना सूचना दिली. ठाणेदार प्रदीप लांबट यांच्यासह उपनिरीक्षक सोनाली गोरे व सहकारी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी प्रभाकर हा विहिरीतील मोटरपंपच्या पाईपला पकडून लटकत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या मोटरपंपचे वायर कापण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रभाकरला बाहेर सुखरूप काढले. मात्र, आशाचा बुडून मृत्यू झाला. प्रभाकर हा परिसरातील शिवारात छोट्या-छोट्या चोऱ्या करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी पोलिसांसमक्ष केला. तो व त्याची पत्नी चोरी करण्याच्या प्रयत्नात विहिरीत पडले असावे, अशी शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. आपण शेतात भाजीपाला तोडण्यासाठी आलो होतो. पत्नी विहिरीत पडली म्हणून तिला वाचविण्यासाठी आपण धावलो व विहिरीत पडलो, असे प्रभाकरने सांगितले. (वार्ताहर)***